Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

लोकमंच चे अध्यक्ष मनोज भिसे यांनी जिल्ह्यात लैंगिक अत्याचार व आत्महत्येस कारणीभूत असलेल्यांवर कारवाई करावी याबाबत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना निवेदन दिले

लोकमंच चे अध्यक्ष मनोज भिसे यांनी जिल्ह्यात लैंगिक अत्याचार व आत्महत्येस कारणीभूत असलेल्यांवर कारवाई करावी याबाबत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना निवेदन दिले 


सांगली जिल्ह्यात अल्पवयीन मुलांच्या आत्महत्येसह अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराबाबत लोकहित मंच चे अध्यक्ष मनोज भिसे यांच्याकडून केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांना निवेदन सादर केले आहे.
        
सध्या सांगली जिल्ह्यातील अल्पवयीन शाळकरी मुलांच्या आत्महत्येसह आटपाडी मधील तीन अल्पवयीन मुलींना लॉजवर नेऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनांनी खळबळ माजली आहे.  कुपवाड मधील ""झील इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज "" मधील अकरावीच्या वर्गात शिकत असलेल्या एका मुलीने शाळेच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. 

तर त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्याच वर्गातील एका विद्यार्थ्याने घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष देण्याची गरज  असल्याने व आटपाडी मधील तिघांनी तीन अल्पवयीन मुलींना लॉजवर नेऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचाही धक्कादायक प्रकार घडला आहे.या घटनांमुळे सध्या जिल्ह्यात खळबळ माजली आहे. पालक वर्गामध्ये याची धास्ती पसरली आहे.

आटपाडीतील युवकांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला असला तरीही,या सर्व घटनांच्या बाबतीत कसून चौकशी आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा करण्याबाबत निवेदन देण्यात आलेल  आहे. सर्वच बाजूनी तपास करण्यासाठी हा तपास जलद गतीने करण्यात यावा, अशी मागणी  लोकहित मंचच्या मनोज भिसे यांच्यासांगली जिल्ह्यात अल्पवयीन मुलांच्या आत्महत्येसह अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराबाबत लोकहित मंच चे अध्यक्ष मनोज भिसे यांच्याकडून केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांना निवेदन सादर केले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.