Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जिल्हा परिषद भरतीचा निकाल जाहीर! वरिष्ठ सहायक, विस्तार अधिकारी पदाची गुणवत्तायादी संकेतस्थळावर

जिल्हा परिषद भरतीचा निकाल जाहीर! वरिष्ठ सहायक, विस्तार अधिकारी पदाची गुणवत्तायादी संकेतस्थळावर


जिल्हा परिषदेमधील विविध संवर्गाच्या पदभरती परीक्षेचा निकाल जाहीर झाला. वरिष्ठ सहायक (लेखा) या पदासाठीची गुणवत्ता यादी गुरुवारी संकेतस्थळावर झळकली. आज विस्तार अधिकारी (सांख्यिकी) व विस्तार अधिकारी (कृषी) या पदांचा निकालही जाहीर करण्यात आला.

उर्वरित पदांसाठीचे निकालही लवकरच जाहीर केले जातील, असे सूत्रांनी सांगितले. 'आयबीपीएस' या कंपनीने जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा निवड समितीकडे निकाल सोपवला. जिल्हा परिषदेच्या विविध संवर्गातील एकूण ९३७ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. एकूण ४४ हजार ७२६ उमेदवारांनी अर्ज केले होते. उमेदवारांना हा निकाल जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावरही प्रसिद्ध झाला आहे. 

विविध संवर्गातील पदांसाठी गेली अडीच महिने वेगवेगळ्या वेळी परीक्षा घेण्यात आली. त्यामुळे प्रक्रियेतील अखेरची परीक्षा २३ डिसेंबर २०२३ पर्यंत सुरू होती. यातील भरती प्रक्रियेतील आरोग्य सेवक पुरुष (४० टक्के), आरोग्य सेवक पुरुष (५० टक्के), आरोग्य सेवक महिला, कंत्राटी ग्रामसेवक व अंगणवाडी मुख्य सेविका या आदिवासी भागातील (पेसा) पदांच्या भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली आहे.

त्यामुळे या ५ संवर्गातील पदांची परीक्षा अद्यापि झाली नाही. निकाल संकेतस्थळावर जाहीर केल्यानंतर निवड समितीच्या मान्यतेने कागदपत्रांची पडताळणी करण्यात येऊन त्यानंतर नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत. पुढील निवड प्रक्रिया जिल्हा निवड समितीच्या मान्यतेने पूर्ण केली जाईल, जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पाडली पार पाडली जात आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.