कवठेमहांकाळ : दुचाकी होंडा शोरूमला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान
कवठेमहांकाळ येथे नवीन बस स्टँड समोर होंडा शोरूमला भीषण आग लागली. या दुर्घटणेत नवीन जुन्या मोटर सायकली जळून खाक झाल्या. या दरम्यान शेजारच्या महालक्ष्मी स्वीट मार्ट व चार-पाच दुकानांनाही आग लागली.
या भीषण आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले. या परिसरात काळ्याकुट्ट धुराचे लोट हवेत पसरू लागल्याने नागरिकांनी या ठिकाणी धाव घेतली. त्यामुळे या परिसरात नागरिकांची गर्दी झाली. यावेळी हा परिसर धुराने व्यापलेला होता. दरम्यान अग्निशमन पथकाने घटनास्थळी धाव घेतली असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.