Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुख्यमंत्री याच्या ठाण्यात कोरोनाचा कहर; राज्यात कोरोनाच संकट वाढलं

मुख्यमंत्री याच्या ठाण्यात कोरोनाचा  कहर; राज्यात कोरोनाच संकट वाढलं 


महाराष्ट्रात कोरोना JN.१ च्या नव्या व्हेरियंटचे १९ रुग्ण आढळून आले आहेत. या आकडेवारीनुसार राज्यात जेएन.१ व्हेरियंटचे रुग्णांची एकूण संख्या २९ झालीय. गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनाचे १३१ नवीन रुग्ण आढळले आहेत.
तर या २४ तासांत ५१ जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय.

पुण्यात सर्वाधिक गुन्हे दाखल झाले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये संपूर्ण देशात कोविड-१९च्या सब-व्हेरियंट जेएन-१ चे रुग्णांमध्ये वाढ झालीय. दरम्यान आज नवीन वर्ष साजरं करण्यासाठी होणारी गर्दी बघता केंद्र आणि राज्य सरकारांनी नवीन ओमिक्रॉम सब व्हेरियंट जेएनच्या धोक्याचा इशारा दिलाय.

आज आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, ठाण्यात सर्वाधिक १९० सक्रीय कोरोना रुग्ण आढळली आहेत. तर मुंबईत १३७ सक्रीय रुग्ण आहेत. त्यानंतर पुण्यात सक्रीय १२६ रुग्ण आढळून आले आहेत. नाशिकमध्येही कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. नाशिकमधील महात्मानगर परिसरातील दोन महिलांना तर अंबड परिसरातील एका युवकास कोरोनाची लागण झालीय. त्यामुळे महापालिकेची आरोग्य-वैद्यकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आलीय. रुग्ण आढळलेल्या परिसरात कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात येत आहे. महात्मानगरमधील ३२ वर्षीय महिलेला सर्दी, खोकल्याचा त्रास जाणवू लागल्यानंतर एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होतं. या महिलेची आरटीपीसीआर चाचणी पॉझिटीव्ह आढळून आली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.