Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गरजू व निराधार नागरिकांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ मिळावा : आमदार सुधीरदादा गाडगीळ

गरजू व निराधार नागरिकांना  संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ मिळावा : आमदार सुधीरदादा गाडगीळ


गरजू व निराधार नागरिकांना  संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ मिळावा: आमदार सुधीरदादा गाडगीळ,  सांगली शहर संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची बैठक संपन्न

शुक्रवार ०५ जानेवारी २०२४ : सांगली शहर  संजय गांधी निराधार अनुदान योजना समिची बैठक आज संपन्न झाली. सदर बैठकीस अध्यक्ष व आमदार सुधीर दादा गाडगीळ, प्रियानंद  कांबळे, पायल पाटील, अशोक गोसावी, कयुम शेख, हेमलता मोरे, अनिल शेटे, आनंद चिकोडे, रामचंद्र देशपांडे हे सर्व सदस्य आणि शासकीय सदस्य म्हणून प्रभाग अधिकारी सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका व सचिव तथा तहसिलदार संजय गांधी निराधार योजना शाखा सांगली शहर श्री नागनाथ भोसले तसेच सर्व कर्मचारी उपस्थित होते. नुतन अध्यक्ष व सदस्यांचे स्वागत तहसिलदार यांनी केले. सांगली महानगरपालिका क्षेत्रातील गरजू नागरिकांना या संजय गांधी निराधार योजना , श्रावण बाळ योजना ,विधवा पेन्शन योजना व संबधित इतर योजना या सर्व योजनांचा लाभ गरजू व पात्र नागरिकांना मिळाला पाहिजे. यासाठी सर्व सदस्यांनी व अधिकारी यांनी प्रामाणिकपणे काम करावे व सर्व योजना गरजू नागरिकांपर्यत पोहचवण्या बाबत आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी सर्व सदस्यांना आवाहन केले. यावेळी या योजने मधील सर्व सदस्यांना नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला.

सदर बैठकीमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचे २०४ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी १५८ प्रकरणे पात्र व ४६ प्रकरणे अपात्र करणेत आली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.