Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ब्रेकिंग न्यूज! लालकृष्ण आडवाणींचा अयोध्यादौरा रद्द, कारण.....

ब्रेकिंग न्यूज! लालकृष्ण आडवाणींचा अयोध्यादौरा रद्द, कारण.....


मुंबई : आज अयोध्या नगरी सजली आहे. भारतीयांचा आनंद द्वीगुणीत झाला आहे. प्रभू श्री राम यांच्या मंदिराचा आज उद्घाटन सोहळा आहे. या सोहळ्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून लाखो लोक अयोध्येला पोहोचले आहेत.

त्यातच आता या सोहळ्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजपचे वरिष्ठ नेते तथा माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी आज रामलल्ला यांच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी अयोध्येला जाणार नाहीत. ते दिल्ली येथील आपल्या निवासस्थानीच या भव्य समारंभाचा आनंद घेणार आहेत. तर भाजपचे दुसरे मोठे नेते मुरली मनोहर जोशी प्राणप्रतिष्ठा समारंभात येणार नाहीत. 

(रघुवीर स्वीट्स मध्ये चॉकोलेट पासून बनवलेली राम मंदिर )

का येणार नाहीत अडवाणी, जोशी? 

लालकृष्ण आडवाणी हे 96 वर्षांचे आहेत. मुरली मनोहर जोशी यांचे वय 90 वर्षे आहे. अयोध्येतील वातावरण थंड आहे. यामुळे प्रकृतीच्या कारणावरून दोन्ही नेत्यानी अयोध्येत न जाण्याचा निर्णय घेतला आहे. आडवाणी यांनी म्हटलं की, भव्य सोहळ्याला प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची संधी मिळाली ही भाग्याची गोष्ट आहे. श्री रामाचे मंदिर हे केवळ पूजेचे मंदिर नाही. या देशाचे पावित्र्य आणि या देशाच्या प्रतिष्ठेच्या स्थापनेचे हे निमित्त आहे, असं आडवाणी यांनी म्हटलं आहे.

आडवाणी म्हटलं की, दीर्घ प्रतिक्षेनंतर आम्ही भारताच्या स्व चे प्रतीक पुन्हा तयार केले. ते आपल्या सर्वांच्या प्रयत्नांच्या जोरावर पूर्ण झाले आहे. आपण आपली दिशा शोधण्याचा प्रयत्न अनेक दशकांपासून करत आहोत, आपल्याला ती सापडली आहे आणि ती प्रस्थापित झाली आहे. आता प्रत्येक भारतीयांच्या मनात एक विश्वास निर्माण झाला आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळे संपूर्ण देशातील वातावरण मंगलयमय झाले आहे. या वेळी आपणास प्रत्यक्ष तिथे हजर राहण्याची संधी मिळणे म्हणजे कुठल्यातरी जन्मात कुठेतरी केलेले चांगले कृत्याचे फळ आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी कृष्ण गोपाल, राम लाल आणि आलोक कुमार यांनी आडवाणी यांच्या घरी जात त्यांना या सोहळ्यासाठी आमंत्रित केलं होतं. त्यावेळी आपल्याला या सोहळ्यात सहभागी होण्याची संधी मिळत आहे ही मोठी भाग्याचीच बाब असल्याची प्रतिक्रिया आडवाणी यांनी दिली होती. देशात राम मंदिर साकारण्यात आल्यामुळे एका विश्वासाचाच पाया रचला गेला असून, देशातील वातावरण मंगलमय झालं आहे, हा विचारही त्यांनी मांडला होता.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.