Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुतीन यांची हत्या ते जागतिक आर्थिक संकट... नव्या वर्षासाठी बाबा वेंगांची भाकितं

पुतीन यांची हत्या ते जागतिक आर्थिक संकट... नव्या वर्षासाठी बाबा वेंगांची भाकितं


बाबा वेंगा हे बल्गेरियामधील एक जगप्रसिद्ध भविष्यवेत्ता आहेत. त्यांनी आतापर्यंत केलेल्या सुमारे 85 टक्के भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. युक्रेन युद्ध, कोरोना महामारी, अमेरिकेतील भीषण 9/11 हल्ला तसेच प्रिन्सेस डायना यांचा मृत्यू या गोष्टींची भविष्यवाणी बाबा वेंगा यांनी आधीच केली होती.


बाबा वेंगा यांनी 2024 या वर्षासाठी देखील काही भविष्यवाण्या केल्या आहेत. पाहूयात काय आहेत त्या.. पुतीन रशियाचे अध्यक्ष वाल्दिमीर पुतीन यांची यावर्षी हत्या होईल, असं बाबा वेंगाने आपल्या भविष्यवाणीमध्ये म्हटलं आहे. विशेष म्हणचे पुतीन यांची हत्या त्यांच्याच देशातील एखादी व्यक्ती करेल असं यात म्हटलं आहे. गेल्या वर्षीच पुतीन यांच्याविरोधात वॅगनर ग्रुपच्या प्रमुखाने बंड केलं होतं. यावेळी या दोघांमध्ये मोठं युद्ध होण्याची शक्यता निर्माण झाली होती. सोबतच, पुतीन यांच्या तब्येतीबाबत देखील वारंवार विविध बातम्या आणि अफवा समोर येत असतात.

अणुचाचणी आणि दहशतवाद

एक मोठा देश यावर्षी अणु चाचणी किंवा जैविक शस्त्रास्त्रांची चाचणी करू शकतो, असंही बाबा वेंगा यांनी म्हटलं आहे. यासोबतच युरोपीय राष्ट्रांमध्ये दहशतवाद वाढणार असल्याचं भाकित त्यांनी केलं आहे. 2024 साली सायबर हल्ल्यांमध्ये वाढ होण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. पॉवर ग्रिड आणि इतर गोष्टींना हॅकर्स टार्गेट करतील असं म्हटलं आहे.


आर्थिक संकट

2024 साली मोठं आर्थिक संकट येणार आहे. जागतिक अर्थव्यवस्थेवरील ताण वाढल्यामुळे देश-देशांमधील तणाव वाढणार आहे. कित्येक देश इतर देशांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतील; असं भाकित बाबा वेंगांनी केलं आहे. सध्या चीन तैवानवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे, आणि इस्राइल पॅलेस्टाईनला संपवण्याच्या तयारीत आहे.

पृथ्वीवरील बदल

यावर्षी पृथ्वीवर एक मोठा बदल होणार आहे. असा बदल खरंतर शेकडो वर्षांमध्ये एकदा दिसून येतो. मात्र, यावर्षी असं झालं, तर पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात नैसर्गिक संकटे येऊ शकतात, असं बाबा वेंगा यांनी म्हटलं आहे.

चांगली गोष्ट

बाबा वेंगांनी एक चांगलं भाकित देखील केलं आहे. यावर्षी वैद्यकीय क्षेत्रात मोठे शोध लागण्याची शक्यता आहे. अल्झायमर आणि कॅन्सरसारख्या आजारांवर यावर्षी औषध विकसित होऊ शकतं, असं त्यांनी म्हटलं आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.