Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अजित पवार यांच्या उपस्थितीत भाजप आमदाराची राष्ट्रवादीच्या पदाधिकारयास मारहाण

अजित पवार यांच्या उपस्थितीत भाजप आमदाराची राष्ट्रवादीच्या पदाधिकारयास मारहाण 


भाजप आमदार सुनील कांबळे यांनी राष्ट्रवादीच्या सातव यांच्या कानशिलात लगावल्याचा प्रकार समोर आला आहे. तृतीयपंथीयांच्या वार्ड उद्घाटन कार्यक्रमातपाटीवर नाव नसल्यामुळे आमदार सुनील कांबळे संतप्त पुण्याच्या ससून रुग्णालयात आमदार सुनील कांबळे यांनी एका पोलिस कॉन्स्टेबलच्या कानशिलात लगावली आहे. ससून रुग्णालयाती एका कार्यक्रमात सुनील कांबळे यांनी थेट पोलिसावरच हात उचलला आहे. त्याआधी सुनील कांबळे यांनी या कार्यक्रमासाठी आलेल्या राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्यालाही मारहाण केल्याचा आरोप आहे.

दरम्यान, उद्घाटनाच्या पाटीवर आमदार सुनील कांबळे यांचे नाव न टाकल्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाला. यावेळी कांबळे यांनी राष्ट्रवादीचे वैद्यकीय मदत सेलचे प्रमुख जितेंद्र सातव यांच्याही कानशिलात लगावली आहे. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोरच हा प्रकार घडला आहे.

नेमके काय घडले?

अजित पवारांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षाचे वैद्यकीय मदत कक्षाचे महाराष्ट्र प्रमुख जितेंद्र सातव यांना भाजपचे पुणे कॅन्टोन्मेंटचे आमदार सुनील कांबळे यांनी कानशीलात लगावली आहे. पुण्यातील ससुन रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. ससून रुग्णालयात तृतीय पंथीयाच्या स्वतंत्र वॉर्डचे उद्घाटन पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र या कार्यक्रमाच्या कार्यक्रम पत्रिकेत स्थानिक आमदार म्हणून आपले नाव नसल्याचे म्हणत आमदार सुनील कांबळे संतप्त झाले आणि त्यांनी सातव यांच्या कानशीलात लगावली. यानंतर सातव यांनी आपण या घटनेची माहिती अजित पवारांना देऊ अस म्हटले आहे. तर उद्घाटनाचा कार्यक्रम संपल्यानंतर मंचावरून खाली उतरताना कांबळे यांनी त्या ठिकाणी कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी शिवाजी सरक यांच्या कानशिलात लगावल्याची माहिती आहे. दरम्यान, आमदार कांबळे यांच्या या कृत्यानंतर आता पोलिस काय कारवाई करणार? हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सुनील कांबळे आहेत कोण?

2019 च्या विधानसभा निवडणुकीत ते पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून निवडून आले होते. आमदार होण्यापूर्वी कांबळे 1992 पासून पुणे महापालिकेत नगरसेवक होते. कांबळे यांनी पश्चिम बंगालच्या 2021 च्या निवडणुकीत बालूरघाट विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रचार आणि बूथ स्तरावर संपर्क साधण्याचे भाजपच्या बाजूने काम केले. कांबळे हे सध्या महाराष्ट्र विधिमंडळातील अनुसूचित जाती विधी समितीचे सदस्य आहेत. भाजपचे आक्रमक आमदार म्हणून त्यांची ओळख आहे.

यापूर्वी वादामुळे चर्चेत

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर राष्ट्रवादी पदाधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यास सुनील कांबळे यांनी मारहाण केली. यामुळे त्यांच्या अडचणी वाढणार आहेत. कार्यक्रम संपल्यावर एकाच्या कानशिलात त्यांनी लागवल्याची गंभीर दाखल अजित पवार यांनी घेतल्याची माहिती आहे. तर यापूर्वी पुणे महानगरपालिकेच्या एक वरिष्ठ महिला अधिकारी सुष्मिता शिर्के यांना शिवीगाळ केल्याची तथाकथित ऑडियो क्लिप चांगलीच व्हायरल झाली होती. त्यांनी महिला अधिकाऱ्यास घाणेरडया भाषेत शिवीगाळ केली होती.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.