Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पनवेलमध्ये श्री राम बाईक रॅलीवर हल्ला, तिघेजण गंभीर जखमी : गाडयांची तोडफोड

पनवेलमध्ये श्री राम बाईक रॅलीवर हल्ला, तिघेजण गंभीर जखमी : गाडयांची तोडफोड 


मुंबईच्या मीरा रोड परिसरात रविवारी रात्री दोन गटात राडा झाल्याची घटना ताजी असताना सोमवारी संध्याकाळी पनवेल मध्ये श्री राम बाईक रॅली दरम्यान राडा झाल्याचे वृत्त हाती येत आहे.

या हल्ल्यात तिघेजण गंभीर जखमी झाले असून वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नये व शांतता राखावी, असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

सोमवारी 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिरात मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठेचा सोहळा पार पडला. त्यानिमित्त देशभरात विवीध कार्यक्रम साजरे केले जात आहेत. पनवेलमध्ये शिवसेना शिंदे गटाचे रुपेश पाटील यांनी श्री राम बाईक रॅलीचे आयोजन केले होते.

खारघरहुन पनवेलच्या दिशेने रॅली जात असताना पनवेल मोहल्ला दरम्यान रॅली पोहचली असताना पाठीमागून हल्ला झाला. या हल्यात तिघेजण गंभीर जखमी झाले असून डोक्यावर आणि पाठीवर वार झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तसेच या राड्यामध्ये इनोव्हा, फॉर्चूनर कार आणि दुचाकींची तोडफोड करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.

अशीच एक घटना रविवारी रात्री मुंबईच्या मीरा रोड परिसरात घडली. मीरा रोड परिसरात दोन गटांमध्ये तणाव निर्माण होऊन हिंसक हाणामारी झाली. गोंधळ घालणाऱ्या जमावाने दगड आणि लाठ्यांचा वापर करून परिसरातील वाहनांची तोडफोड केली. तसेच जमावातील काही समाजकंटकांनी एका महिलेलाही लक्ष्य केले. यात तिच्या डोक्याला जखम झाली. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले असून सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.

रावेरमध्ये देखील एका मिरवणुकीच्या दिशेने दगड आल्याची घटना घडली. मिरवणूक सुरु असताना अचानक दगड आल्याने काही वेळ नागरिकांमध्ये गोंधळ उडाला. या प्रकरणी पोलिसांनी 15 संशयितांना ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी रावेरमध्ये आणि ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी मोठा फौजफाटा तैनात केला आहे. सध्या घटनास्थळी तणावपूर्ण शांतता आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.