आता डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळणार नाहीत 'ही' औषधं; सरकारकडून डॉक्टर-केमिस्टना कडक सूचना
एंटीबायोटीक्सच्या गोळ्यांचा वापर आजकाल मोठ्या प्रमाणात होतोय. अशातच आता सरकारने एंटीबायोटीक्सच्या औषधांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. डायरेक्टरेट जनरल ऑफ हेल्थ सर्विसने भारताच्या फार्मासिस्ट एसोसिएशनला एंटीबायोटीक्सच्या औषधांसंदर्भात पत्र लिहिलंय.
या पत्राद्वारे, सामान्या नागरिकांना एंटीबायोटीक्सची औषधं देण्यापूर्वी डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन तपासावं असं अपील केमिस्टना केलं आहे. या आदेशांची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात यावी असं सांगण्यात आलंय. या यादीतील अँटी-मायक्रोबियल्समध्ये अँटी-सेप्टिक, अँटी-बायोटिक, अँटी-व्हायरल, अँटी-फंगल आणि अँटी-परजीवी औषधांचा समावेश आहे. याशिवाय जर डॉक्टर रुग्णाला लो एंटीमायक्रोबायल्स औषधं घेण्याचा सल्ला देत असतील तर त्याची कारणं सांगावीत.
2019 मध्ये तब्बल 13 लाख लोकांचा मृत्यू
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशात असं म्हटलंय की, अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स (AMR) जगभरातील आरोग्यासाठी धोकादायक आहे. आकडेवारीनुसार, 2019 मध्ये एएमआर बॅक्टेरियामुळे सुमारे 13 लाख लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. याशिवाय ड्रग रेझिस्टंट इन्फेक्शनमुळे 50 लाख मृत्यू झाले आहेत. 20 व्या शतकाच्या सुरूवातीला कोणत्याही आजारातून बरं होण्यासाठी एक महिना लागला. परंतु आता एंटीमायक्रोबायल्स औषधं (अँटीबायोटिक्स, अँटीफंगल्स आणि अँटीव्हायरल औषधे) आता या रोगांवर त्वरित उपचार करण्यासाठी याचा वापर केला जातो.एंटीबायोटीकचा वापर बॅक्टेरिया मारण्यासाठी केला जातो. परंतु जर एखादी व्यक्ती सतत एंटीबायोटीक्सचा वापर करत असेल तर त्याची प्रतिकारशक्ती कमकुवत होऊ लागते. ही पुन्हा पुर्ववत होण्यासाठी बराच काळ लागतो. याला अँटी-मायक्रोबियल रेझिस्टन्स (AMR) म्हणतात. भारतातील औषधांशी संबंधित कायद्यांतर्गत, सर्व प्रकारच्या एंटीबायोटीक्स H आणि H1 श्रेणींमध्ये ठेवण्यात आलंय. ही औषधे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय विकता येत नाहीत.
एंटीबायोटीक्सच्या अतिवापरामुळे बॅक्टेरिया सुपरबग बनतोय
एंटीबायोटिक्सच्या अतिवापरामुळे बॅक्टेरिया सुपरबग बनतोय. त्यामुळे किरकोळ आजारही बरा होण्यासाठी आता वेळ लागतो. म्हणजेच एखादा लहान आजार स्वतःहून लवकर बरा होत नाही. डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, यामुळे न्यूमोनिया, टीबी, ब्लड पॉयसनिंग या आजारांवर उपचार करणं अधिक कठीण होतंय. परिणामी लोकांना त्यांचा जीव गमवावा लागतोय.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.