Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुलीचं पळून जाऊन लग्न, वडिलांनी जावयासह घरी बोलावलं, मग...

मुलीचं पळून जाऊन लग्न, वडिलांनी जावयासह घरी बोलावलं, मग...

देशभरात दिवसेंदिवस गुन्हेगारी घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचं दिसत आहे. विशेषत: प्रेमप्रकरणाशी संबंधित गुन्हे होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. अशीच एक घटना मुझफ्फरपूर जिल्ह्यात घडली आहे.

बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये एक हृदयद्रावक प्रकरण समोर आलं आहे. मुलीच्या प्रेमविवाहामुळे संतापलेल्या वडिलांनी तिला आणि तिच्या नवऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मुलीने प्रेमविवाह केल्यामुळे वडील संतापले होते. आरोपीने मुलगी आणि जावई यांना कोणत्या तरी बहाण्याने घरी बोलवून घेतलं. दोघांनाही खोलीत बंद करून त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्याचा प्रयत्न केला. मुलगी आणि तिच्या पतीने आराडाओरडा केला व कसाबसा आपला जीव वाचवला. या प्रयत्नात आरोपीची मुलगी गंभीर जखमी झाली. सध्या जखमी मुलीवर मुझफ्फरपूर येथील एसकेएमसीएचमध्ये उपचार सुरू आहेत.


 

या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, मुझफ्फरपूर येथील मीनापूर पोलीस स्टेशन हद्दीतील वासुदेव छपरा गावात राहणाऱ्या जुहीने सोनू नावाच्या मुलासोबत पळून जाऊन लग्न केलं होतं. दोघांनी साधारण सहा महिन्यांपूर्वी कोचिंग क्लासमधून पळून जाऊन लग्न केलं होतं. दोघेही सहा महिन्यांपासून कुटुंबियांपासून दूर राहत होते. लग्नाअगोदर दोघेही एकाच कोचिंग क्लासमध्ये शिकत होते. यादरम्यान त्यांच्यात प्रेमसंबंध तयार झाले होते. मात्र, दोघांची जात वेगळी असल्याने घरच्यांनी लग्नाला नकार दिला होता.

पीडितेनं सांगितलं की, तिच्या वडिलांनी तिला कागदपत्रे घेण्यासाठी घरी बोलावलं होतं. त्यामुळे रविवारी ती आपल्या पतीसह गावी गेली होती. मात्र, वडिलांनी तिला व तिच्या पतीला एका खोलीत कोंडून धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात पीडित मुलगी जखमी झाली तर, तिचा नवरा कसाबसा घराचा दरवाजा उघडून बाहेर पडला. त्याने आरडाओरडा केल्यानंतर गावकरी जमा झाले. त्यामुळे दोघांचा जीव वाचू शकला.सध्या जखमी मुलीवर मेडिकल ओपी पोलिसांच्या देखरेखीखाली एसकेएमसीएचमध्ये उपचार सुरू आहेत. मुलीच्या जबाबाच्या आधारे पुढील कारवाई करण्यात येईल, असं मेडिकल ओपी प्रभारींनी सांगितलं.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.