Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कवी खडताळे काव्य स्पर्धेचा निकाल जाहिर प्रज्ञा घोडके प्रथम, प्रा.इंद्रजित पाटील द्वितीय

कवी खडताळे काव्य स्पर्धेचा निकाल जाहिर प्रज्ञा घोडके प्रथम, प्रा.इंद्रजित पाटील द्वितीय


कवी खडताळे काव्य स्पर्धेचा निकाल जाहिर
प्रज्ञा घोडके प्रथम, 
प्रा.इंद्रजित पाटील द्वितीय

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे अंतर्गत उत्तर महाराष्ट्र व नाशिक जिल्हा यांचे वतीने परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जेष्ठ साहित्यिक मा. देविदास खडताळे यांचे ७४ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कविता स्पर्धेचा निकाल परिषदेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख तथा नाशिक जिल्हा अध्यक्ष नवनाथ अर्जुन पा. गायकर यांनी नुकताच घोषित केला आहे. या स्पर्धेत पुण्याच्या श्रीमती प्रज्ञा घोडके यांच्या 'समर्पण' या कवितेस प्रथम क्रमांक जाहीर झाला आहे.
द्वितीय क्रंमाक सोलापुर येथील प्रा.इंद्रजीत पाटील यांच्या 'टोळीतली दिवाळी' या कवितेस जाहिर झाला आहे. 
तृतीय क्रंमाक जेष्ठ कवी अशोक निळकंठ सोनवणे यांच्या 'विडा' या कवितेस चतुर्थ क्रंमाक नाशिक येथील सुप्रसिध्द साहित्यिक तुकाराम ढिकले यांच्या 'मी खोदतोय लेणी' या कवितेस  पाचवा क्रंमाक खारघर, नवी मुंबई  येथील श्रीमती भारती सावंत यांच्या 'जातं' या कवितेस जाहिर झाला आहे. 
     
या बरोबर आणखी पाच कवींना उत्तेजनार्थ पारितोषिक जाहीर झालेले आहे. त्यांची नावे पुढील प्रमाणे - 
सुभाष कटकदौंड ,रायगड (मी समजुन घेतले) 
प्रविण लोहार (माझी कविता) 
प्रकाश पाटील जळगाव (मुलानों अपसेट होऊ नका )
सचिन कोरोचीकर (माझ्या मुला)
श्रीमती सुरेखा वाडकर इचलकरंजी (स्वर्ग)
             
ही स्पर्धा दरवर्षी आयोजित करण्यात येत असुन यंदा या स्पर्धेचे पाचवे वर्ष आहे.
विजेत्या कवीचें परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे, प्रदेश अध्यक्ष फुलचंद नागटिळक, प्रदेश उपाध्यक्ष देविदास खडताळे  इत्यादींसह विविध पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे. दरम्यान या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा लवकरच होणार असून या बाबतची घोषणा लवकरच करण्यात येईल अशी माहिती गायकर यांनी दिली आहे. 

अभुतपूर्व प्रतिसाद, साहित्यिकांचे आभार
मा.खडताळे सराचें वाढदिवसानिमित्त आयोजित या वर्षीच्या स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. तब्बल १७५ कवींनी यात सहभाग घेतला. हा प्रतिसाद अभूतपूर्व आहे.

नवनाथ गायकर
आयोजक

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.