Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुष्पा २'च्या कथेबद्दल नवी अपडेट; अल्लू बोलणार जपानी भाषेत

पुष्पा २'च्या कथेबद्दल नवी अपडेट; अल्लू बोलणार जपानी भाषेत 


अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा द रुल’ला मोठं करण्यासाठी त्याचे निर्माते जमतील ते हातखंडे वापरत आहेत. चित्रपटाचे शूटिंग नियोजित वेळेपेक्षा अधिक काळ लांबणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाचे शूटिंग जुलैपर्यंत पूर्ण होईल. हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२४ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित करायचे निर्मात्यांनी ठरवले होते, त्यानुसारच तारीखही पक्की करण्यात आली होती . एकतर अशा परिस्थितीत निर्माते ‘सालार’ची रणनीती अवलंबतील. म्हणजेच चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याचे प्रमोशन करतील अन्यथा त्याची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली जाईल.

लवकरच ‘पुष्पा द रूल’चे निर्माते याबाबतीतील निर्णय जाहीर करतील. चित्रपटाच्या कहाणीबद्दल एक नवी माहिती समोर आली आहे. ‘सिनेजोश’ वेबसाइटच्या माहितीनुसार ‘पुष्पा द रूल’मध्ये अल्लू अर्जुनचे पात्र एका जपानी तस्कराशी दोन हात करताना पाहायला मिळणार आहे.त्याच्याशी संवाद करता यावा यासाठी अल्लू अर्जुन जपानी भाषेचा वापर करणार आहे. याचाच अर्थ अल्लू अर्जुन चित्रपटात जपानी भाषेत बोलताना दिसणार आहे.

‘पुष्पा २’ काही कारणास्तव सतत लांबणीवरच पडत आहे. गेल्या डिसेंबरमध्ये अभिनेता जगदिश यांना पोलिसांनी अटक केली होती. जगदिशने चित्रपटात ‘पुष्पा’च्या मित्राची भूमिका निभावली होती. एका ज्युनिअर आर्टिस्टला आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याचा आरोप जगदीशवर करण्यात आला होता. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि जगदीश हा सध्या जामीनावर बाहेर सुटला आहे.

लवकरच आता ‘पुष्पा २’चं उर्वरित चित्रीकरण तो पार पाडणार आहे. एकूणच ‘पुष्पा द रूल’चं पोस्टपोन होणं अजय देवगणच्या ‘सिंघम अगेन’साठी फायद्याचं ठरणार आहे. रोहित शेट्टीनेही त्याच्या आगामी ‘सिंघम अगेन’ची तारीख १५ ऑगस्ट २०२४ ही नक्की केली आहे. त्यामुळे जर ‘पुष्पा द रूल’ पुढे ढकलला गेला तर ‘सिंघम अगेन’साठी ही फार उत्तम संधी असू शकते. अद्याप निर्मात्यांनी असा कोणताही निर्णय घेतलेला नसून लवकरच याबाबतीत ते घोषणा करतील.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.