Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

प्रभाग १० मध्ये समस्यांचा डोंगर निर्माण झाला आहे. या भागातील ड्रेनेज, गटारी,रस्ते,हे मुलभूत सुविधाही नागरिकांना मिळत नाहीत, तातडीने या समस्या सोडवाव्यात अन्यथा तीव्र आंदोलन करु असा इशारा आण्णा फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक मासाळे यांनी महापालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे दिला आहे.

सांगली दिं. सांगली महापालिका क्षेत्रातील प्रभाग १० मध्ये  समस्यांचा डोंगर निर्माण झाला आहे. या भागातील ड्रेनेज, गटारी,रस्ते,हे मुलभूत सुविधाही नागरिकांना मिळत नाहीत, तातडीने या समस्या सोडवाव्यात अन्यथा तीव्र आंदोलन करु असा इशारा आण्णा फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक मासाळे यांनी महापालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे दिला आहे.

प्रभाग १० मधील बायपास रोड, जासूद मळा, अष्टविनायकनगर, तात्यासाहेब मळा, या भागातील स्ट्रीट लाईट ,रस्ते, व गटारी, आणि ड्रेनेजच्या गंभीर समस्या निर्माण झाली आहे.अनेक दिवस झाले तरी या भागातील  विशेषतः वरद हॉस्पिटल समोरील व तात्यासाहेब मळा ते मीरा हौसिंग सोसायटी हे रस्ते खोदलेले आहेत,त्याची  तातडीने दुरुस्ती होण्याची गरज आहे.मात्र महापालिका प्रशासन जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.महापालिकेत सद्या प्रशासकीय कारभार आहे.सर्वसामान्य जनतेच्या मुलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात आहे. येत्या आठ दिवसांत या भागाची आयुक्तांनी प्रत्यक्ष पाहणी करून समस्यांचे निराकरण करावे अन्यथा तीव्र आंदोलन करु असा इशारा मासाळे यांनी दिलेल्या निवेदनात दिला आहे.
   
या निवेदनावर सुशांत मलगोंडा पाटील,रेखा अशोक मासाळे, रियाज शेख,सचिन पाटील,हर्ष नगरची परविन कांबळे विजय होळी कट्टे यांच्या सह्या आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.