आई-वडिलांचा सांभाळ नकोय, मग प्रॉपर्टी विसरा, सांगलीच्या नरवाड ग्रामसभेत ठराव मंजूर
नरवाड (जि. सांगली) : नरवाड (ता. मिरज) येथील ग्रामसभेत आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्यांना त्यांच्या स्थावर मालमत्तेवर वारस न लावण्याचा निर्णय एकमताने मंजूर करण्यात आला.
प्रजासत्ताक दिनाच्या ग्रामसभेने हा एकमुखी निर्णय घेतला आहे. ग्रामपंचायतीकडे अशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने सरपंच मारुती जमादार यांनी हा विषय ग्रामसभेत मांडला होता. याला ग्रामसभेने मंजुरी दिली. असा निर्णय घेणारी नरवाड ही जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. नव्या पिढीकडून आई-वडिलांचा सांभाळ करण्यास टाळाटाळ केली जाते. त्यांना स्वत:च्याच घरातून बाहेर काढण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने हा ठराव मंजूर केला.
स्वत:चे सर्वस्व अर्पण करून आशेवर जे जीवन जगत आलेत त्या थकलेल्या हातांना मायेचा आधार मिळवून देण्यासाठी मी हा एक प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
- मारुती जमादार, सरपंच,
नरवाड, ता. मिरज
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.