Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कंबरेत घुसलेली सळई तरूणाच्या थेट जांघेतून आरपार

कंबरेत घुसलेली सळई तरूणाच्या थेट जांघेतून आरपार


ठाण्यातील  वर्तकनगर परिसरात एक भयानक प्रकार घडला आहे. रौनक रेसीडन्सी नावाच्या इमारतीचं बांधकाम सुरू असलेल्या या ठिकाणी ही विचित्र घटना घडली. बांधकामासाठी उभारण्यात आलेल्या लोखंडी सळ्यांवर एक 19 वर्षीय तरूण एवढ्या जोरात आदळला की, एक सळई त्याच्या कंबरेत घुसून दुसऱ्या पायाच्या जांघेतून बाहेर निघाली. या भयंकर घटनेनंतरही हा तरूण शुद्धीत होता ही आश्चर्याची बाब आहे. त्याला तत्काळ उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं.

तरूणासोबत नेमकं घडलं काय?

मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार रविवारी (14 जानेवारी) घडला. रौनक रेसीडन्सी नावाच्या निर्माणाधीन साईटवर असलेल्या सुरक्षारक्षकाने याबाबत पोलिसांना माहिती दिली. सुरक्षारक्षकाला हा तरूण बांधकामासाठी लावण्यात आलेल्या लोखंडी सळ्यांवर पडलेला दिसला. त्याच्या डाव्या बाजूच्या कंबरेत सळई शिरून ती उजव्या पायाच्या जांघेतून आरपार निघाली होती.

सुरक्षारक्षकाने हे पाहताच इतर कामगारांना बोलावलं. पण हा तरूण या साईटवर कामगार म्हणून काम करत नव्हता. यावेळी कामगारांनी ग्राइंडर मशीनच्या मदतीने या तरुणाच्या शरीरात घुसलेली सळई मुख्य साचापासून वेगळी केली आणि रुगणवाहिकेतून उपाचारांसाठी त्याला खासगी रुग्णालयात नेण्यात आलं. सध्या तरूणावर उपचार सुरू आहेत. तसंच तो याठिकाणी कसा पोहोचला? इथे का आला होता? कसा पडला? त्याला कोणी मुद्दाम धक्का तर दिला नाही ना? याबाबत पोलीस प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.