Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सागंली! महिलेचा दगडाने ठेचून..धारदार शस्त्राने सपासप वार करून खूनचार संशयित ताब्यात ; हल्लेखोरात दोन महिला- दोन पुरुषांचा समावेश

 सागंली!  महिलेचा दगडाने ठेचून..धारदार शस्त्राने सपासप वार करून खूनचार संशयित ताब्यात ; हल्लेखोरात दोन महिला- दोन पुरुषांचा समावेश

सांगली दि.३:  कडेगांव तालुक्यातील नेवरी येथे पंचवीस वर्षीय महिलेचे डोके दगडाने ठेचून आणि धारदार शस्त्राने गळा, डोक्यावर सपासप वार करून निघृनपणे खून केल्याची घटना घडली. ही घटना वा-यासारखी नेवरी परिसरात पसरताच, परिसरात मोठी  खळबळ उडाली.
        
हल्लेखोरानी मृत महिलेच्या पतीसह  चुलतदीरावरही गंभीर वार केल्याने तेही गंभीर जखमी झाले आहेत.  प्रियांका अजय महाडीक (वय २५ )असे खून झालेल्या महिलेचे नाव असून, अजय आप्पासो महाडीक ( वय ३० ) व नवनाथ बाबूराव महाडीक ( वय ४५ ) अशी गंभीररित्या जखमींची नांवे आहेत. अजय यास विटा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या घटनेची पोलिसांत नोंद झाली असून, याप्रकरणी तारामती आप्पासो महाडीक, शरद आप्पासो महाडीक, उज्वला शरद महाडीक, अभिषेक शरद महाडीक या चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हल्ल्याचे नेमके कारण समजू शकले नाही.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.