Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ऑनलाइन फसवणूक झाली तर नो टेन्शन! या नंबरवर कॉल करताच पूर्ण पैसे येतील परत

ऑनलाइन फसवणूक झाली तर नो टेन्शन! या नंबरवर कॉल करताच पूर्ण पैसे येतील परत

नवी दिल्ली : भारतात सध्याच्या काळात डिजिटल पेमेंटमध्ये मोठ्या संख्येत वाढ होतेय. यासोबतच आजकल बँकिंग अ‍ॅप्सच्या माध्यमातून अकाउंट मॅनेजही केले जातात. या माध्यमातून महत्त्वाचं ट्रांझेक्शन केले जातता. लाखो रुपयांचे ट्रांझेक्शन देखील आजकल बँकिंग अॅप्सच्या माध्यमातून सह होतात. मात्र यामुळे फसवणूक होण्याची जोखिमही वाढली आहे. सायबर क्राइमचे प्रमाण वाढलेय. दरदिवशी लोकांसोबत अशा घटना घडत आहेत. जिथे त्यांच्या अकाउंटमधून पैसे ऑनलाइन पद्धतीने लूटले जातात. हे लक्षात घेऊनच सरकारकडून एक नंबर जारी करण्यात आला आहे. जो नंबर देशातील प्रत्येक नागरिकाला माहिती असायला हवा. जेणेकरुन त्या स्थितीत तुम्हाला योग्य मदत मिळू शकेल.

आज प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आले आहेत. यामुळे सायबर गुन्हेगारांना चांगलीच संधी मिळालीये. हातात मोबाईल आल्यामुळे अनेकदा चुकीच्या लिंकवर क्लिक केल्यामुळे किंवा मग चुकीचं अ‍ॅप डाउनलोड केल्यामुळे लोकांच्या अकाउंटमधील पैसे दुसऱ्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर होतात. अनेकदा अकाउंट हॅक केलं जातं. मात्र अशा घटना तुमच्यासोबत घडल्या तर अजिबात घाबरु नका. असं काही घडल्यास केंद्रीय गृह मंत्रालयद्वारे जारी करण्यात आलेल्या नंबरवर डायल करुन तत्काळ या घटनेची माहिती द्या.


या नंबरवर नोंदवा सायबर गुन्हा

तुम्हीही सायबर क्राइमला बळी ठरला असाल तर तत्काळ 1930 नंबरवर डायल करा. या नंबरवर त्या नंबरने कॉल करा, ज्यावर तुमचं UPI ID किंवा बँक अकाउंट लिंक असेल. हा सांगितलेला नंबर सिटिझन फायनेंशियल सायबर फ्रॉड रिपोर्टिंग अँड मॅनेजमेंट सिस्टमशी संबंधित आहे. या नंबरवर कॉल केल्याने तुम्हाला फ्रॉडशीसंबंधीत माहिती मागितली जाईल.

लक्षात ठेवा की, ATM PIN किंवा नेट बँकिंगसारखे डिटेल्स यावरुन मागितले जाणार नाहीत. यासोबतच अशा संवेदनशील माहिती तुम्ही कोणासोबतही शेअर करु नका. तुम्हाला केवळ नाव, पत्ता, फ्रॉडच्या पद्धती आणि वेळ यांसारखी माहिती द्यावी लागेल.

या नंबरवर कॉल केल्यानंतर तुमच्या तक्रारीवर तत्काळ अ‍ॅक्शन घेतली जाईल. तसंच अकाउंटमधून गेलेले पैसे तुम्हाला परत मिळतील असा प्रयत्न केला जाईल. हा नंबर MHA चा टोल फ्री नंबर आहे. यावर कधीही सायबर क्राइमची तक्रार नोंदवली जाऊ शकते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.