Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कर्नाटकातील कलबुर्गीत आंबेडकरांचा फोटो हाती घ्यायला लावून विद्यार्थ्याची काढली नग्न परेड

कर्नाटकातील कलबुर्गीत आंबेडकरांचा फोटो हाती घ्यायला लावून विद्यार्थ्याची काढली नग्न परेड


कलबुर्गी : कर्नाटकातील कलबुर्गी येथे आंबेडकर पूजेत सहभागी न झाल्यामुळे एका विद्यार्थ्याची विवस्त्र करून शहरभर परेड करण्यात आली.

यावेळी त्यांच्या हातात डॉ.भीमराव आंबेडकर यांचा फोटो होता. नग्न परेड दरम्यान, घोषणाबाजी करण्यात आली आणि त्याला मारहाण आणि शिवीगाळ करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, कलबुर्गी येथील महाविद्यालयात शिकणाऱ्या काही वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी गुरुवारी (२५ जानेवारी २०२४) आंबेडकर पूजेचे आयोजन केले होते. पीडित विद्यार्थीही त्याच वसतिगृहात राहत होता. त्याला आंबेडकर पूजेला उपस्थित राहण्यास सांगितले. मात्र, विद्यार्थ्याने वैयक्तिक कारणामुळे सहभागी होण्यास नकार दिला.

यानंतर पूजेचे आयोजन करणाऱ्या विद्यार्थ्यांसह इतर विद्यार्थ्यांनी त्याला मारहाण केली आणि शिवीगाळही करण्यात आली. यानेही आरोपी विद्यार्थ्यांचे समाधान झाले नाही तेव्हा त्यांनी विद्यार्थ्याला विवस्त्र केले आणि कलबुर्गीतील रस्त्यावरून त्याची परेड काढली. यावेळी आंबेडकरांचा फोटोही त्याच्या हाती देण्यात आला. नग्न परेड काढताना आरोपी विद्यार्थ्यांनी पोलिसांना पाहताच पीडित विद्यार्थ्याला सोडून पळ काढला.

यावेळी आरोपींनी पीडित विद्यार्थ्याचा अर्धनग्न अवस्थेतील व्हिडिओही बनवत आला. त्यानंतर त्यांनी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. बारावीत शिकणारा 19 वर्षीय पीडित विद्यार्थी ज्या वसतिगृहात राहत होता ते वसतिगृह सरकार चालवत असल्याचे सांगण्यात येत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.