Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

परदेशी सिगारेटची तस्करी १०.८ कोटींचा साठा जप्त

परदेशी सिगारेटची तस्करी १०.८ कोटींचा साठा जप्त

मुंबई :  कारपेटच्या आडून दुबईहून न्हावा शेवा बंदरात आणलेलया कंटेनरमधून १०.८ कोटींचा परदेशी सिगारेटचा साठा जप्त करण्यात आला आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) मुंबई युनिटने ही कारवाई केली असून अधिक तपास सुरु आहे.

डीआरआयने दिलेल्या माहितीनुसार, नाव्हा शेवा बंदरात विदेशी सिगारेटचा साठा येणार असल्याची माहिती डीआरआयच्या मुंबई पथकाला मिळाली. त्यानुसार, पथकाने झाडाझडती घेतली. यादरम्यान "चायनीज व्हिस्कोस विणलेले कार्पेट' म्हणून घोषित केलेल्या मालामध्ये विदेशी सिगारेटचा कंटेनर जप्त करण्यास यश आला. यामध्ये जवळपास १०.८ कोटींचा ६७.२० लाख सिगारेट्सचा समावेश आहे.


हा माल दुबईच्या जेबेल अली बंदर येथून न्हावा शेवा बंदरात पाठवण्यात आला होता. दोन कंटेनर जप्त करण्यात आले आहे. यामध्ये कोरियामध्ये तयार केलेलया सिगारेटचा समावेश आहे. कस्टम अधिकाऱ्यांपासून माल लपविण्यासाठी तस्करांनी त्यावर जुन्या वापरलेल्या कारपेटचा आधार घेतला होता. त्यानुसार, कारवाई करत डीआरआय अधिक तपास करत आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.