Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

प्रियकराकडून प्रेयसीचा गोळ्या झाडून खून!

प्रियकराकडून प्रेयसीचा गोळ्या झाडून खून!


पिंपरी चिंचवड :  पिंपरी-चिंचवड येथील हिंजवडी परिसारत एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रियकराने गोळ्या झाडून प्रेयसीचा खून केल्याची घटना घडली. हिंजवडी येथे रविवारी २८ जानेवारीला हा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी प्रियकर तरुणास ताब्यात घेतलं आहे. या घटनेमुळे आयटी पार्क परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. वंदना द्विवेदी (रा. उत्तर प्रदेश) असं खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. ऋषभ निगम (रा. उत्तर प्रदेश) असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, ऋषभ निगम हा वंदना हिचा प्रियकर आहे. त्याने शनिवारी २७ जानेवारीला रात्री उशिरा वंदना हिच्यावर गोळ्या झाडून तिची हत्या केली. हिंजवडी येथील लक्ष्मी चौकात ही घटना घडली आहे. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ऋषभ याला ताब्यात घेतले आहे. वंदना हिच्यावर गोळीबार का करण्यात आला, हा प्रकार रात्री नेमका किती वाजता घडला, याबाबत पोलिस तपास करत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.