Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पेट्रोल मिळेना म्हणून पठ्ठ्याने काढला घोडा; झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा व्हिडिओ व्हायरल

पेट्रोल मिळेना म्हणून पठ्ठ्याने काढला घोडा; झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा व्हिडिओ व्हायरल


ट्रकचालकांच्या देशव्यापी आंदोलनांमुळे गेल्या दोन दिवसांपासून पेट्रोल पंपांवर भयंकर गर्दी पहायला मिळत आहे. कित्येक पेट्रोल पंप बंदही झालेले पहायला मिळाले. या सगळ्यात झोमॅटोचा एक डिलिव्हरी बॉय चांगलाच चर्चेत आला आहे. याला कारण म्हणजे, तो डिलिव्हरीसाठी चक्क घोड्यावर जात आहे.

या डिलिव्हरी बॉयचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ हैदराबादच्या चांचलगुडा भागातील असल्याचं सांगण्यात येत आहे. या व्हिडिओमध्ये तो घोड्यावर डिलिव्हरी करण्याचं कारणही सांगत आहे. 

"ऑर्डर घेऊन निघालो, मात्र तीन तास रांगेत थांबूनही पेट्रोल मिळालं नाही.." असं हा डिलिव्हरी बॉय एका व्यक्तीला सांगत आहे. यासोबतच तो व्हिडिओ घेणाऱ्या इतर लोकांनाही हात हलवून अभिवादन करताना दिसत आहे.

नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

या व्हिडिओवर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देखील पहायला मिळत आहेत. ट्रकचालकांना पाठिंबा दर्शवण्यासाठी किंवा स्वतःची मार्केटिंग करण्यासाठी झोमॅटोनेच ही शक्कल लढवली असल्याची शक्यता नेटिझन्स व्यक्त करत आहेत. तर, अशा प्रकारे डिलिव्हरी करताना बॉक्समधील जेवण नीट राहिले असेल का? असा प्रश्नही एकाने उपस्थित केला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.