Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सरकार इतके नालायक असू शकते.आता छातीवर गोळ्या पडल्या तरी माघार नाही: मनोज जरांगे पाटील

सरकार इतके नालायक असू शकते.आता छातीवर गोळ्या पडल्या तरी माघार नाही: मनोज जरांगे पाटील


सरकार इतके नालायक असू शकते.आता छातीवर गोळ्या पडल्या तरी माघार नाही.मनोज जरांगे पाटील यांच्या डोळ्यात अश्रू मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते भावूक झाले अन् आक्रमक झाले. आता प्राण गेले तरी माघार नाही, आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही. मराठ्यांच्या अंगावर आरक्षणाचा गुलाल लागणारच आहे.

अंतरवलीतून मी जरी एकटा निघत असलो तरी मुंबईमध्ये तीन कोटी लोक येणार आहेत. मी गमिनी कावा करणार आहोत. सर्व काही आताच सांगणार नाही. आंदोलनाचे वेगवेगळे टप्पे आम्ही केले आहेत. मराठ्यांनो आता ही शेवटची लढाई आहे. आता घरी राहू नको. जे मुंबईला जातील त्याला सोडण्यास इतर मराठ्यांनी जावे, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

सरकार इतके नालायक असू शकते…

आरक्षणासाठी मराठा समाजाचे आंदोलन गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. या आंदोलनात शेकडो मराठे शहीद झाले आहेत. अनेक माता-भगिनींचे कुंकू पुसले गेले आहे. अनेक घरातील कर्ता पुरुष गेला आहे. परंतु त्यानंतर सरकारने आरक्षण दिले नाही. आपली मुले मरत असताना सरकारला झोप कशी येते? सरकार इतके नालायक असू शकते का? सरकार निर्दयी आहे. निष्ठूर आहे. मराठा समाजाबद्दल हा सर्व विचार करताना मला रात्ररात्र झोप येत नाही. यामुळे आता आरपारची लढाई करण्याचा निर्णय मी घेतला आहे.

आता मी शहीद झालो तरी माघार नाही. माझ्या छातीवर गोळ्या पडल्या तरी मागे हटणार नाही. मराठयांसाठी टोकाचे पाऊल उचलणार आहे. सरकारच्या दारात मरण आले तरी आता माघार नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही.

मी एकटा निघतो…पण तीन कोटी मराठा येतील

येथून मी एकटा निघतो. परंतु मुंबई जवळ आल्यावर तुम्हाला कोट्यवधी दिसतील. मुंबईत तीन कोटी मराठा दिसणार आहे, असे आमचे नियोजन झाले आहे. आम्ही अनेक गोष्टी उघड केल्या नाहीत. सरकार ज्या पद्धतीने वागणार तशी आमची रणनीती तयार आहे. मराठा मुलांनी आपले अंथरुण, पांघरुन, जेवणाचे साहित्य सोबत घ्या. सर्वांनी शिस्तीत यावे. व्यसन करु नका. गोंधळ करणाऱ्यांना पोलिसांच्या ताब्यात देत, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.