Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षकाचा मद्यपान करुन जिल्हा परिषदेत धिंगाणा

राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षकाचा मद्यपान करुन जिल्हा परिषदेत धिंगाणा


राष्ट्रपती पुरस्कार  प्राप्त शिक्षकाने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात मद्यपान करुन गोंधळ घातला. माझे काम केले नाही तर इमारतीवरुन उडी मारीन, अशी धमकी देऊन एकच धिंगाणा घातला. या शिक्षकाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निलंबित केले आहे. 


शिक्षक विजय कुंडलिक आमटे असे या शिक्षकाचे नाव आहे.  सध्या आष्टी तालुक्यातील दौलावडगाव केंद्रांचा प्रभारी पदभार त्यांच्याकडे आहे.  त्यांच्या पदोन्नतीचे प्रकरण जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागात प्रलंबित आहे. 
पदोन्नतीच्या अनुषंगाने ते ५ जानेवारीला जिल्हा परिषदेत आले होते.
 
त्यांनी सकाळी शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर ते दुपारी पुन्हा शिक्षण विभागात आले.  पदोन्नतीबाबतची संचिका तत्काळ प्रस्तावित का करत नाहीत? अशी विचारणा करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

माझे काम लवकर करा, नाही तर मी इमारतीवरुन उडी मारीन अशा शब्दात त्यांनी शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांना धमकाविण्यास सुरुवात केली. मद्यपान करुन त्यांनी कर्मचार्‍यांशी हुज्जत घातली़ कर्मचार्‍यांनी याची तक्रार शिक्षणाधिकारी यांच्याकडे केली.

शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक यांची भेट घेऊन तक्रार मांडली.  त्याची पाठक यांनी गांभीर्याने दखल घेत शिक्षक विजयकुमार आमटे यांना गैरवर्तन केल्याप्रकरणी निलंबित केले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.