Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीत 'ऑनर किलींग'चा थरार, दोघांना अटक

सांगलीत 'ऑनर किलींग'चा थरार, दोघांना अटक


सांगली :  सांगली जिल्ह्यात रविवारी रात्री ऑनर किलींगचा थरार चांगलाच रंगला. बहिणीशी प्रेम प्रकरण असल्याच्या संशयातून भावाने साथीदारांच्या मदतीने तरूणाचा चाकू, कोयत्याने सपासप वार करत मित्राचाच खात्मा केला. रविवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास बामणोली (ता. मिरज) येथील दत्तनगर येथे घडली. याप्रकरणी चौघांविरोधात कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मुख्य संशयितासह दोघांना अटक करण्यात आली आहे.

ओम श्रीधर देसाई (वय १८, रा. दत्तनगर, बामणोली, मूळ रा. अलकूड (एस), ता. कवठेमहांकाळ) असे मृत तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी ओंकार जावीर, सोहम पाटील, ज्ञानेश्वर पाटील, एक अनोळखी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी मृत ओमचा भाऊ आदेश श्रीधर देसाई (वय २४) याने फिर्याद दिली आहे. याप्रकरणी मुख्य संशयित ओंकार जावीर आणि सोहम पाटील यांना पोलिसांनी अटक केली आहे.

संशयित आणि मृत ओम एकमेकांचे मित्र होते. बामणोलीतील दत्तनगर येथील मोकळ्या जागेत ते नेहमी एकत्र गप्पा मारत असत. संशयित ओंकार याच्या बहिणीशी मृत ओम याचे प्रेमप्रकरण असल्याचा संशय त्याला होता. त्यातून त्याने रविवारी रात्री तीन मित्रांना सोबत घेतले. रविवारी रात्री असेच ते बोलत बसले असताना ओंकार आणि त्याच्या मित्रांनी ओमवर चाकू आणि कोयत्याने हल्ला केला. त्यात ओम रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर संशयित तेथून पसार झाले. याप्रकरणी चौघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. कुपवाड एमआयडीसी पोलिस अधिक तपास करत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.