Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राम नाव लिहिलेला दगड पाण्यात बुडत नाही; रामसेतूचा पाण्यावर तरंगणारा दगड पाहिला का? पाहा व्हिडीओ

राम नाव लिहिलेला दगड पाण्यात बुडत नाही; रामसेतूचा पाण्यावर तरंगणारा दगड पाहिला का? पाहा व्हिडीओ


प्रभू श्रीरामांनी लंकेतून माता सीतेची सुटका करण्यासाठी वानरसेनेच्या मदतीने एक पूल बांधला होता. जो रामसेतू म्हणून ओळखला जातो. पाण्यावर तरंगणाऱ्या दगडाचा वापर करुन हा रामसेतू पूल बांधण्यात आला होता. रामसेतूसाठी वापरण्यात आलेले दगड अनेक ठिकाणी संग्रहित करुन ठेवण्यात आलेत. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये राम लिहलेला दगड पाण्यावर तरंगत असल्याचा दिसतोय. हा रामसेतुचा दगड असल्याचे म्हटले जाते. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. अयोध्येच्या राम मंदिराचे उद्घाटन पार पडले. राम लल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्यामुळे देशात सर्वत्र रामभक्त जल्लोषात उत्सव साजरा करताना दिसत आहे. सोशल मीडियावर सुद्धा श्रीरामाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आहे.



या व्हायरल व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एका पंडिताच्या हातात एक दगड आहे. त्यावर राम हे नाव लिहिलेय. हे पंडित हातातला दगड पाण्याच्या मोठ्या टाकीत टाकताना दिसतोय. टाकीत टाकल्यानंतर दगड पाण्याच्या तळाशी जात नाही तर चक्क तरंगताना दिसतो. हा रामसेतूतील दगड असल्याचे सांगितले जात आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. पाण्यावर तरंगणारा दगड पाहून कोणीही थक्क होईल. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. रामसेतू साठी वापरला जाणारा दगड हा ‘प्युमिस स्टोन’ असून तो पाण्यात तरंगत नाही, असे अनेक तज्ज्ञांचे मत आहे तरीसुद्धा अनेक राम भक्त याला श्रीरामाचा चमत्कार मानतात.


storiesofbharat7 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “रामसेतू हा पूल मात् सीतेसाठी प्रभू रामाचे कधीही न संपणारे प्रेम आणि आपुलकीचे प्रतिनिधित्व करते. जय श्री राम धनुषकोडीजवळील रामसेतू रामेश्वरमजवळील भारताचा शेवटचा पॉइंट” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्सनी ‘प्युमिस स्टोन’ असून पाण्यात बुडत नसल्याचे लिहिलेय. अनेक युजर्सनी या व्हिडीओवर जय श्री रामचा जयघोष केला आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.