Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शरद मोहोळ खून प्रकरणातील आरोपींना दणका, गुन्हे शाखेची मोठी कारवाई

शरद मोहोळ खून प्रकरणातील आरोपींना दणका, गुन्हे शाखेची मोठी कारवाई


पुणे : गुंड शरद मोहोळ खून प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. आतापर्यंत या प्रकरणी एकूण १५ जणांना अटक करण्यात आलीय. शरद मोहोळची साहिल उर्फ मुन्ना पोळेकर आणि त्याच्या साथीदाराने गोळ्या झाडून हत्या केली होती.

हत्येनंतर १२ तासांच्या आत हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर मुख्य सूत्रधारासह इतरांना अटक केली होती. शरद मोहोळ हत्या प्रकरणातील सूत्रधार विठ्ठल शेलार, गणेश मारणे याच्यासह सतरा जणांवर गुन्हे शाखेने मोक्का कारवाई केलीय. आत्तापर्यंत या प्रकरणात मुख्य सूत्रधार विठ्ठल शेलार, साहिल उर्फ मुन्ना पोळेकर, नामदेव कानगुडे, अमर कानगुडे, चंद्रकांत शेळके, विनायक गव्हाणकर, विठ्ठल गांदले, रामदास मारणे यांच्यासह १५ जणांना अटक करण्यात आली आहे.

पुण्यात सुतारदरा इथं गुंड शरद मोहोळ याची ५ जानेवारी रोजी साहिले पोळेकर आणि त्याच्या साथीदारांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली होती. शरद मोहोळच्या हत्या प्रकरणी अटक केलेल्यांमध्ये दोन वकिलांचाही समावेश आहे. दरम्यान, अद्याप या प्रकरणी मुख्य सुत्रधार गणेश मारणे फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

मोक्का कधी लावण्यात येतो? 

गुन्हेगारी पार्श्वभूमी तयार करणाऱ्या आरोपीला आधी समज देण्यात येते. पण तरीही आरोपीने गैरफायदा घेतला तर त्याची नोंद पोलीस रेकॉर्डला होते. अटकेनंतर तडीपारची कारवाईसुद्धा करण्यात येते. त्यानंतरही सुधारणा झाली नाही तर तडीपार कारवाई करण्यात येते. तरीही आरोपींकडून गुन्हे होत असतील तर त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई होते. हफ्ते वसुली, खंडणी, अपहरण, खून, अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्यांवर मोक्का लावण्यात येतो.

मोक्का लावल्यास काय?

मोक्का लावण्यासाठी दोन किंवा अधिक आरोपींची टोळी असावी लागते. तसंच गुन्हा टोळीमधील अनेकांनी केलेला असल्यास मोक्का कारवाई होते. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एकावर १० वर्षात दोन गुन्ह्यात आरोपपत्र असल्यास ही कारवाई करता येते. मोक्का कारवाईमुळे आरोपींना अटकपूर्व जामीन मिळत नाही. आरोपपत्र सादर करण्यास पोलिसांना ६ मिहने मुदत वाढवून मिळते. तसेच दोषी ठरल्यास जन्मठेप आणि पाच लाखांच्या दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. यात दोषींची मालमत्ताही जप्त करण्याची तरतूद आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.