Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

धावत्या रेल्वेत कोच अटेंडेंटकडून 9 वर्षांच्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न

धावत्या रेल्वेत कोच अटेंडेंटकडून 9 वर्षांच्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न

नागपूर : धावत्या रेल्वेत कोच अटेंडेंटने ९ वर्षीय मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना सोमवारी मध्यरात्री घडली. पाटलीपूत्र एक्सप्रेसमध्ये घडलेल्या या प्रकारानंतर रेल्वे पोलिसांनी कोच अटेंडेंटविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला प्रवाशांनी बेदम चोपही दिला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, बंगळुरू पटना पाटलीपूत्र एक्सप्रेस नागपूरच्या दिशेने येत होती. या कोचमध्ये एक ९ वर्षांची मुलगी, तिचा लहान भाऊ, आई आणि आजी प्रवास करत होत्या. त्यावेळी बुटीबोरी स्थानकाजवळ ९ वर्षांची चिमुकली बाथरूमला जायला निघाली. मध्यरात्री दीडच्या सुमारास सर्व प्रवाशी झोपेत असताना बाथरूमला गेलेल्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न आरोपीने केला.


कोच अटेंडेंटने मुलगी बाथरूममध्ये शिरताच तिच्या पाठोपाठ आत शिरला आणि दाराची कडी आतून लावून घेतली. त्यानं मुलीचे कपडे काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा घाबरलेल्या मुलीने आरडाओरडा केला. यावेळी आरोपीने मुलीला पैशाचे आमिष दाखवण्याचाही प्रयत्न केला. मात्र मुलगी आरडाओरडा करत राहिली. शेवटी त्याने दाराची कडी काढताच मुलगी बाहेर पळाली.

दरम्यान, आरडाओरडा होताच प्रवाशांसह कुटुंबियांनी मुलीला विचारणा केली. तेव्हा मुलीने घडलेला प्रकार सांगितल्यानंतर प्रवाशी संतापले. त्यांनी आरोपीला तिथेच मारहाण केली. त्यानंतर रेल्वे पोलिसांना माहिती देण्यात आली. रेल्वे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून त्याच्यावर पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी मुन्ना याला अटक करण्यात आली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.