Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राज्यसभेतील 68 खासदार होणार निवृत्त..

राज्यसभेतील 68 खासदार होणार निवृत्त..

लोकसभा निवडणूक 2024 तोंडावर आली असतानाच देशभरातील राजकीय पक्षांमध्ये संघटनांतर्गत रस्सीखेच सुरु झाली आहे. खास करुन ही रस्सीखेच विविध राजकीय पक्षातील थेट जनतेतून निवडून येण्याची खात्री नसलेल्या पण संघटनेत बौद्धीक वर्तुळात काम करणाऱ्या मंडळींमध्ये अधिक आहे.

या नव्या वर्षात राज्यसभा या संसदेच्या वरिष्ठ सभागृहातील 68 जागा रिक्त होत आहेत. त्यामुळे या जागांसाठी लवकरच निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. परिणामी राज्यसभेतील खासदारकीचा कार्यकाळ समाप्त होणारे आणि याजागांसाठी इच्छुक असलेल्या बहुतांश मंडळींनी आतापासूनच आखणी करण्यास सुरुवात केली आहे. जाणून घ्या राज्यनिहाय जागा आणि कार्यकाळ संपणाऱ्या खासदारांची नावे.

राज्यसभेच्या रिक्त होत असलेल्या राज्यनिहाय जागांची एकूण संख्या:

राज्यसभा सदस्यांच्या कार्यकाळ समाप्तीनुसार उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक 10 जागा रिक्त होतील. त्यानंतर महाराष्ट्र आणि बिहारमध्ये प्रत्येकी सहा जागा असतील. मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि गुजरात या राज्यातील प्रत्येकी चार जागा रिक्त होतील. ओडिशा, तेलंगणा, केरळ आणि आंध्र प्रदेश यासारख्या इतर राज्यांमध्ये प्रत्येकी तीन जागा रिक्त असतील, तर झारखंड आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी दोन जागा असतील. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये प्रत्येकी एक जागा रिक्त असेल. 


निवृत्त होणारे प्रमुख सदस्य:

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन आणि काँग्रेस सदस्य कुमार केतकर यांच्यासह अनेक प्रमुख सदस्य निवृत्त होणार आहेत. नारायण राणे, प्रकाश जावडेकर आणि अनिल देसाई यांसारख्या प्रभावशाली व्यक्तींच्या निवृत्तीमुळे राज्यातील आगामी निवडणुकांसांठी मोठी रणनिती आखली जाणार आहे. राजकीय या सर्व चेहऱ्यांना पुन्हा संधी देणार का? याबाबत उत्सुकता आहे.

महाराष्ट्र आणि कर्नाटकावर लक्ष केंद्रित:

माराष्ट्रात राज्यसभेच्या सहा जागा रिक्त होत आहेत. त्यातच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात मोठी फूट पडली आहे. दोन्ही पक्ष कोर्टकचेऱ्यामध्ये गुंतले आहेत. अशा स्थितीत बदललेल्या राजकीय पार्श्वभूमीवर राज्यसभा मिळविण्यासाठी अनेक चेहरे चर्चेत आहेत. यात प्रामुख्याने एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे पक्ष अधिक प्रबळ ठरतील. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडे मात्र संख्याबळ कमी असल्याने अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष नेमके कोणाचे? हा प्रश्न निर्माण झाल्याने हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. अशा पार्श्वभूमीवर राज्यसभेसाठी कोणाला संधी मिळते याबातब उत्सुकता आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.