Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'त्या' 5 कंटेनर करीता क्षणात चौक झाला मोकळा: मराठा आंदोलकांनी रस्ता केला मोकळा

'त्या'  5 कंटेनर करीता क्षणात चौक झाला मोकळा: मराठा आंदोलकांनी रस्ता केला मोकळा 

वडगाव शेरी: मराठा मूक मोर्चा वेळी मोठ्या शिस्तीची अनुभूती संपूर्ण महाराष्ट्राला यापूर्वी आली होती. तसाच अनुभव आज मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा खराडी येथे दाखल झाल्यावर सगळ्यांना आला.

मोर्चा खराडी चौकात आल्यावर येथे पाय ठेवायलाही जागा नव्हती. त्यामुळे नगर रस्त्यावरून हडपसरकडे जाणारी वाहतूक पोलिसांनीही अगोदरच थांबवली होती.  नेमके त्याच वेळी एका मागोमाग एक असे पाच मोठे मालवाहतूक कंटेनर चौकात येताना आंदोलकांना दिसले. आंदोलकांनी चौकशी केल्यावर हे कंटेनर सैन्य दलाशी संबंधित अति महत्त्वाचे साहित्य वाहून नेत असल्याची माहिती समजली.

त्यामुळे प्रसंगावधान राखत स्वयंसेवकांनी पुढाकार घेतला आणि काही क्षणातच मोर्चात सहभागी नागरिकांना बाजूला सारून कंटेनरला रस्ता मोकळा करून दिला. कंटेनर मागे असलेल्या जीप मधून सैन्य दलाचे अधिकारी त्यांच्या देखरेखीखाली हे कंटेनर घेऊन जात होते. आंदोलकांनी रस्ता मोकळा करून दिल्याचे पाहून या जीप मधील सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांनीही हात हलवून आंदोलकांचे आभार मानले. तर आंदोलकांनीही या सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांना सॅल्युट ठोकला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.