Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तुरीचा एक दाणा ठरला 3 वर्षीय बालकाचा काळ: तडफडून मृत्यू

तुरीचा एक दाणा ठरला 3 वर्षीय बालकाचा काळ: तडफडून मृत्यू 


घरात असलेले तुरीचे दाणे खात असताना पाटसूळ येथील एका तीन वर्षीय बालकाच्या नाकात तुरीचा दाणा अडकल्याने तीन वर्षीय चिमुकल्याचा तडफडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवार, 23 जानेवारी रोजी रात्री घडली.


या घटनेमुळे शोकाकूल झालेल्या गावकर्‍यांनी चूलही पेटविली नाही. या  बालकाची आजी घरात तुरीचे दाणे काढत असताना त्यांचा तीन वर्षीय नातू योगिराज अमोल ईसापुरे हा आजीजवळ आला. आजीने काढून ठेवलेल्या तुरीचे दाणे त्याने घेतले.व ते खात असतानाच त्यातील एक दाणा त्या बालकाच्या नाकात गेला. परिणामी त्याला श्वास घेण्यास त्रास झाला. तो तडफडत असल्याचे पाहून कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णालयात भरती करण्याचा प्रयत्न केला; परंतु वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली.

 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.