Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

रुम नंबर 306 मध्ये खुनी थरार. रक्त, पिस्तुल आणि तरुणी, पुणं पुन्हा हादरलं

रुम नंबर 306 मध्ये खुनी थरार. रक्त, पिस्तुल आणि तरुणी, पुणं पुन्हा हादरलं

पुणे : पुणे शहरात एमपीएससी पास तरुणी दर्शना पवार हिची हत्या काही महिन्यांपूर्वीच झाली होती. आता पुन्हा प्रेमप्रकरणातून आयटी अभियंता असणाऱ्या महिलेची तिच्या प्रियकराकडून हत्या झाली आहे. पुण्यातील एका हॉटेलमधी खोलीत तरूणीचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह आढळल्याने एकच खळबळ माजली. वंदना द्विवेदी (वय 26) असं मृत तरूणीचं नाव असून ती सॉफ्टवेअर इंजिनीअर होती. २६ जानेवारीला एक हॉटेलमध्ये तिचा मृतदेह सापडला. 

अथक प्रयत्नांनंतर पोलिसांनी तिच्या मारेकऱ्याचा शोध लावत त्याला अटक केली. तो दुसरा-तिसरा कोणी नसून तिचाच प्रियकर होता. वंदना ही मूळची उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील रहिवासी होती. गेल्या दोन वर्षांपासून ती पुण्यातील हिंजेवाडी येथे इन्फोसिस कंपनीत काम करत होती. तर ऋषभ निगम असे आरोपीचे नाव असून तोही लखनऊचाच रहिवासी होता. रिपोर्ट्सनुसार, शनिवारी रात्री आरोपीने हिंजवडीतील लक्ष्मीनगर भागातील एका खासगी हॉटेलच्या 306 क्रमांकाच्या खोलीत वंदनाची गोळया घालून हत्या केली. आणि तो फरार झाला. मात्र दुसऱ्या दिवशी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना खोलीत मृतदेह सापडल्याने पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली आणि त्यांनी तातडीने तपास सुरू केला.


पिस्तुलासह आरोपीला केली अटक

आरोपी ऋषभ निगम हा देखील मूळचा लखनऊचा रहिवासी आहे. वंदनाच्या खुनानंतर फरार झालेल्या आरोपीला नवी मुंबई येथून अटक करण्यात आली आणि त्याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा पथकाकडे सोपवण्यात आले. त्याच्या ताब्यातून एक पिस्तुलही जप्त करण्यात आली.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, वंदना द्विवेदी आणि निगम लखनऊमध्ये एकाच भागात राहत होते आणि 2014 पासून एकमेकांना ओळखत होते. गेल्या काही वर्षांपासून त्यांचं नातं होतं, मात्र काही काळापासून वंदना आपल्याकडे दुर्लक्ष करत आहेत. ती सोडून जाईल अशी भीती ऋषभला वाटत होती. त्यामुळेच त्यांच्यात वाद झाले.


आरोपीविरोधात गुन्हा दाखल

वंदनाचा खून केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध हिंजवडी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. वंदना द्विवेदी यांच्या हत्येमागचे खरे कारण जाणून घेण्यासाठी आरोपीची चौकशी करण्यात आली. वंदनाचे इतर प्रेम संबंध असल्याचा संशयही आरोपीला होता.

आणखी एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, "आरोपी ऋषभ निगमने एका खासगी हॉटेलमध्ये 306 क्रमांकाची खोली बुक केली. 27 जानेवारी रोजी वंदना द्विवेदी हिची त्याने त्या हॉटेलच्या खोलीत भेट घेतली. मात्र रात्री त्यांच्यात जोरदार वादावादी झाली, यामुळे संतापलेल्या आरोपीने वंदना द्विवेदी हिच्या छातीत आणि डोक्यात गोळ्या झाडून तिची हत्या केली.

रात्री 9.30 ते 10 च्या दरम्यान ही घटना घडली. हत्येनंतर आरोपी फरार झाला. बऱ्याच काळापासून त्यांच्यात वाद सुरू होते, असे प्राथमिक तपासातून स्पष्ट झाले आहे. हत्या करण्यासाठी ऋषभ याने बंदूक कुठून आणली ? याचा तपास हिंजवडी पोलिसांनी सुरू केला आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.