Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

विवाहित तरुणासोबत भयानक घडलं, 3 जणांनी केला सामूहिक बलात्कार

विवाहित तरुणासोबत भयानक घडलं, 3 जणांनी केला सामूहिक बलात्कार

संभल : उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्यानंतर मुलीच काय तर मुलंही सुरक्षित नाहीत, असंच म्हणायची वेळ आली आहे. संभलमध्ये एका विवाहित तरुणावर सामूहिक बलात्कार झाला आहे. गावातल्या तीन तरुणांनीच हे कृत्य केलं. नराधम इतक्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी या घटनेचा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. या प्रकरणी कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर तीन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी एका आरोपीला अटक करण्यात आली असून, दोघांचा शोध सुरू आहे.

सामूहिक बलात्काराचा व्हिडिओ केला व्हायरल

हे प्रकरण संभलच्या रजपुरा पोलीस स्टेशन परिसरात घडलं आहे. 24 वर्षीय तरुण शेतात पहारा देण्यासाठी गेला होता. दरम्यान, त्याच गावातल्या तीन मुलांनी त्याला पकडून शेतात नेलं. शेतात नेल्यानंतर तिघांनीही तरुणावर सामूहिक बलात्कार केला. आरोपींनी या संपूर्ण घटनेचा व्हिडिओही बनवला आणि नंतर तो सोशल मीडियावर व्हायरल केला.


पीडित तरुणाला धमकावलं

या तिघांनीही जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप पीडित तरुणानं केला आहे. तसंच व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. त्याच्यावर अत्याचार करून ते तिघेही पळून गेले, असं पीडित तरुणाने सांगितलं. या कृत्याने मुलगा इतका घाबरला होता, की आरोपीच्या धमकीमुळे तो एक दिवस उलटूनही घरी पोहोचला नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला; पण तो सापडला नाही.

पीडित तरुणाने सांगितला घडलेला प्रकार

दुसऱ्या दिवशी तरुण घाबरत घरी पोहोचला आणि त्याने आपल्याबाबत घडलेली दुर्दैवी घटना घरच्यांना सांगितली. तरुणाने जे सांगितलं ते ऐकून कुटुंबीयांना धक्का बसला. याचदरम्यान, आरोपीने बनवलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या कृत्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पीडित तरुणाच्या कुटुंबीयांनी पोलिस स्टेशन गाठून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

एका आरोपीला अटक, दोघांचा शोध सुरू

रजपुरा पोलीस स्टेशन परिसरातल्या गावातल्या एका महिलेने आपल्या मुलावर सामूहिक बलात्कार झाल्याप्रकरणी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम 377/506/67ए अन्वये गुन्हा दाखल केला आहे. एका आरोपीला अटक करण्यात आली आहे आणि इतर दोघे फरार आहेत. त्यांचा शोध सुरू आहे, अशी माहिती गुन्नौरचे सीओ आलोक कुमार सिद्धू यांनी दिली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.