धक्कादायक! मराठा आरक्षणासाठी सर्वेक्षण करणाऱ्या 2 शिक्षकांना मारहाण; शिवीगाळ केल्याचेही उघड
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य सरकार सर्व पातळीवर प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून सध्या राज्यात मराठा समाजामध्ये किती कुटुंब मागास आहेत याचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. मात्र या सर्वेक्षणामध्ये देखील गोंधळ उडाल्याचे दिसत आहे. मुख्य म्हणजे, सरकारकडून हे सर्वेक्षण व्यवस्थितरित्या घेतले जात नसल्याची टीका करण्यात येत आहे. या सर्व घडामोडीतच आणखीन एक धक्कादायक बाब समोर आली आहे.
यवतमाळमध्ये मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी सुरू असलेल्या सर्वेक्षणावेळी दोन शिक्षकांना शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली आहे. ही घटना यवतमाळमधील जिजाऊ नगर भागात घडली आहे. संदीप पत्रे आणि अमोल बाबरे हे दोन्ही शिक्षण सरकारतर्फे सर्वेक्षण करण्यासाठी गेले होते. या सर्व घटनेनंतर शिक्षकांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. तसेच, दोन्ही शिक्षकांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, 29 जानेवारी रोजी संदीप पत्रे आणि अमोल बाबरे दोन्ही शिक्षक जिजाऊनगर भागामध्ये दुपारच्या वेळी मराठा आरक्षणासाठी सर्वेक्षण करत होते. यावेळीच जिजाऊनगर भागातील एका तरुणाने शिक्षकांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. मात्र तरी देखील शिक्षकांनी दुर्लक्ष करून आपले काम पूर्ण केले आणि घरातून काढता पाय घेतला. मात्र या तरुणाने आणखीन चिडून शिक्षकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या घटनेनंतर पोलिसांनी संबंधित तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.