Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

वडिलांच्या मृत्यूनंतर 2 वर्षाच्या मुलाचा घरात उपासमारीमुळे मृत्यू

वडिलांच्या मृत्यूनंतर 2 वर्षाच्या मुलाचा घरात उपासमारीमुळे मृत्यू

ब्रिटनमधून एक हृदय पिळवटून टाकणारी बातमी समोर आली आहे. इथे भुकेमुळे दोन वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची वेदनादायक घटना समोर आली आहे. खरंतर या घटनेच्या दोन आठवड्यांपूर्वी या चिमुकल्याच्या वडिलांचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाला होता. ज्यामुळे मुलाला कोणीही खायला द्यायला नसल्यामुळे त्याचा ही मृत्यू झाला.

नक्की हे प्रकरण आहे तरी काय?

ब्रॉन्सनला 'असुरक्षित' म्हणून सूचीबद्ध केले गेले होते, ज्यामुळे सामाजिक सेवांद्वारे महिन्यातून किमान एकदा तरी त्यांना तपासले जायचे. बीबीसीच्या वृत्तानुसार, सामाजिक सेवा कार्यकर्त्याचं 27 डिसेंबर रोजी शेवटंचं त्या बाळाचे वडील म्हणजे केनेथशी बोलणं झालं. जानेवारीमध्ये सामाजिक कार्यकर्ता त्याच्या घरी गेले असता दारात प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर त्याने ब्रॉन्सनला इतर पत्त्यांवर शोधण्याचा प्रयत्न केला. जेव्हा ब्रॉन्सन आणि त्याचे वडील सापडले नाहीत तेव्हा त्याने त्याच्या व्यवस्थापकाशी आणि पोलिसांशी संपर्क साधला.

4 जानेवारी रोजी दुसऱ्यांदा घरी जाऊनही प्रतिसाद न मिळाल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली. 9 जानेवारी रोजी, तिसऱ्या प्रयत्नात, सामाजिक कार्यकर्ता बॅटर्सबीच्या घरमालकाशी संपर्क साधतो. त्यानंतर घरात प्रवेश केल्यानंतर मुलगा आणि वडिल दोघांचे ही मृतदेह आढळून आले.


मुलाची आई काय म्हणाली?

मुलाची आई, सारा पिसे यांनी सांगितले की, तिने तिच्या माजी पती केनेथशी झालेल्या वादानंतर ख्रिसमसपूर्वी आपल्या मुलाला शेवटचं पाहिलं होतं. सनशी बोलताना पिसे म्हणाले की, पोस्टमार्टम तपासणीत ब्रॉन्सनचा मृत्यू भूक आणि डिहायड्रेशनमुळे झाल्याचे दिसून आले. ते म्हणाले, 'त्याचे वडील मरण पावले म्हणून तो उपासमारीने मरण पावला.'


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.