Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

20 ते 50 लाखा पर्यंत व्यापारी साठी मिळणार लोन : कसा करायचा अर्ज जाणून घ्या

20 ते 50 लाखा पर्यंत व्यापारी साठी मिळणार लोन : कसा करायचा अर्ज जाणून घ्या 


महाराष्ट्रासहित संपूर्ण देशात बेरोजगारीचा दर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. बेरोजगारीमुळे नवयुवक तरुण त्रस्त झाले आहेत. बेरोजगारी ही संपूर्ण देशासाठी चिंतेचा विषय आहे. अशा परिस्थितीत बेरोजगारी दूर करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना हाती घेण्यात आल्या आहेत. भारत ही जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे.

लवकरच आपली अर्थव्यवस्था जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे. मात्र वेगाने विकसित होत असलेल्या आपल्या देशाला बेरोजगारी नामक लागलेली कीड चिंतेचा विषय आहे. सुशिक्षित तरुणांच्या हाताला काम नसणे हे देशापुढे असलेले एक मोठे संकट आहे.

दरम्यान या संकटातून नवयुवक तरुणांना बाहेर काढण्यासाठी आणि बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे यासाठी 2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम लॉंच केला आहे. या पीएमईजीपी योजनेअंतर्गत सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसायासाठी कर्ज पुरवले जात आहे.

या योजनेअंतर्गत नवयुवकांना तब्बल वीस ते पन्नास लाखांपर्यंतचे कर्ज उपलब्ध होत आहे. यामुळे या पैशातून नवयुवकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता येणार आहे आणि इतर बेरोजगारांना देखील या व्यवसायातून रोजगार उपलब्ध होऊ शकणार आहे. म्हणजे या योजनेमुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या देशातील बेरोजगारी दूर होणार आहे.

केंद्राची ही महत्त्वाकांक्षी योजना मिनिस्ट्री ऑफ मायक्रो, स्मॉल अँड मिडीयम इंटरप्राईजेस मंत्रालयाच्या माध्यमातून राबवली जात आहे. आता आपण या योजनेची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. यासाठी अर्ज कुठे करायचा, कोणकोणत्या व्यवसायांसाठी या योजनेअंतर्गत कर्ज मिळू शकते याविषयी अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कोणाला मिळणार लाभ

कोण-कोणती कागदपत्रे लागतात या योजनेच्या लाभासाठी काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. पॅनकार्ड , आधार कार्ड, कास्ट सर्टिफिकेट, रहिवासी प्रमाणपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्र, मोबाइल नंबर, पासपोर्ट आकाराचा फोटो यांसारखे अनेक महत्त्वाचे कागदपत्र या योजनेच्या लाभासाठी लागतील अशी माहिती देण्यात आली आहे.

अर्ज कुठं करणार

या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येतो. http://www.kviconline.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर इच्छुकांना आणि पात्र व्यक्तींना अर्ज करता येणार आहे. या संकेतस्थळावर गेल्यानंतर PMEGP Loan या ऑप्शन वर क्लिक करून या योजनेअंतर्गत कर्जासाठी अर्ज सादर करता येणार आहे. अर्ज हा काळजीपूर्वक भरायचा असून अर्ज भरताना सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.