Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

प्रसिद्ध अभिनेता ख्रिश्चन ऑलिव्हर आणि त्याच्या 2 मुलींचा विमान अपघातात मृत्यू

प्रसिद्ध अभिनेता ख्रिश्चन ऑलिव्हर आणि त्याच्या 2 मुलींचा विमान अपघातात मृत्यू


पूर्व कॅरिबियनमधील एका बेटाजवळ झालेल्या विमान अपघातात  अमेरिकन अभिनेता ख्रिश्चन ऑलिव्हर  आणि त्याच्या दोन मुलींचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी विमान जवळच्या सेंट लुसियाकडे जात असताना बेकियाजवळील पेटिट नेव्हिस बेटाच्या अगदी पश्चिमेस हा अपघात झाला. त्यांनी मुलींची ओळख 10 वर्षांची मदिता क्लेपसर आणि 12 वर्षांची ऍनिक क्लेपसर अशी केली. याशिवाय विमानाचा पायलट रॉबर्ट सॅक्सचाही अपघातात मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

विमानाने एफ मिशेल विमानतळावरून सेंट लुसियाच्या मार्गावर उड्डाण केले. मात्र, टेक ऑफ करताच विमानात काहीतरी बिघाड झाला. मात्र, विमान पुढे गेले आणि काही अंतरावर गेल्यावर ते कोसळले व पाण्यात पडले. यावेळी उपस्थित लोकांनी सर्वतोपरी प्रयत्न केले, मात्र कोणालाही वाचवता आले नाही. वैमानिक रॉबर्ट सॅक्ससह चार मृतदेह बाहेर काढण्यात आले. दरम्यान, 51 वर्षीय जर्मन वंशाच्या अभिनेत्याने अनेक प्रशंसित चित्रपट आणि टेलिव्हिजनमध्ये महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत. ज्यामध्ये 2008 मध्ये आलेला 'स्पीड रेसर' आणि 'द गुड जर्मन' या चित्रपटाचा समावेश आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.