Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

18,19,20 जानेवारीला पुण्यातील 1 लाख मोबाइल बंद पडणार?? नेमकी भानगड काय??

18,19,20 जानेवारीला पुण्यातील 1 लाख मोबाइल बंद पडणार?? नेमकी भानगड काय??


"पुणे तिथे काय उणे" ही म्हण आजवर आपण ऐकतच आलो आहोत. पुण्यातील पाट्या, पुण्यातील पोस्टर आणि पुण्यातील म्हणी कायमच चर्चेत असतात. सध्या असाच एक सर्वांना प्रश्नात पाडणारा नवीन पोस्टर पुण्यात चर्चेचा भाग बनला आहे. या पोस्टरवर नेमके लिहिले तरी काय आहे? हा पोस्टर कशासाठी लावला आहे असे अनेक प्रश्न सोशल मीडियावर विचारले जात आहेत? परंतु याचे नेमके आणि खरे उत्तर कोणाला माहित नाही.


सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पुण्यातील पोस्टरवर लिहले आहे की, "18,19,20 जानेवारी सायंकाळी पुण्यातील किमान एक लाख मोबाइल स्विच ऑफ होतील." परंतु हा पोस्टर नेमका कोणी आणि कशासाठी लावला? हे कोणाला माहित नाही. पुण्यातील अनेक चौकांमध्ये सध्या असे पोस्टर लावण्यात आले आहेत. मात्र पोस्टर लावण्याचे कारण कोणाला देखील माहित नाही. तसेच या पोस्टरमुळे नागरिकांच्या मनात अनेक संभ्रमण निर्माण झाली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.