Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महिलेला प्रेग्नंट करा, 13 लाखांचे बक्षीस मिळवा, धक्कादायक योजनेचा सूत्रधार अटकेत

महिलेला प्रेग्नंट करा, 13 लाखांचे बक्षीस मिळवा, धक्कादायक योजनेचा सूत्रधार अटकेत


फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. बिहारमध्ये फसवणुकीचे हे अनोखे प्रकरण समोर आले आहे. ऑल इंडिया प्रेग्नंट जॉब एजन्सी या नावाने कंपनी कडून त्या माध्यमातून लोकांची फसवणूक करण्यात येत होती.

या टोळीचा नवादा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. लोकांना फसवण्यासाठी या कंपनीने जी योजना तयार केली ती ही अनोखी अशीच आहे. नवादा पोलिसांनी या टोळीतील 8 जणांना अटक केली आहे. त्यांच्या चौकशीनंतर समोर आलेली कहाणी ही अतिशय धक्कादायक आहे. ही टोळी ऑल इंडिया प्रेग्नंट जॉब एजन्सीच्या नावाखाली लोकांकडून पैसे उकळून त्यांची फसवणूक करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ऑल इंडिया प्रेग्नंट जॉब एजन्सी कशी काम करत होती?

फसवणूक करणाऱ्या टोळीने महिलांना गरोदर बनवायचे त्याबदल्यात पैसे कमावण्याची योजना चालवली होती. टोळीतील सदस्य लोकांना कॉल करायचे. आपली एजन्सी ज्यांना मुले होऊ शकत नाहीत अशा स्त्रियांसाठी काम करते असे हे एजंट सांगत असत. ती महिला जर गर्भवती राहिली तर तुम्हाला 13 लाख रुपयांचे बंपर बक्षीस दिले जाईल असेही हे एजंट सांगत असत. याच बंपर बक्षिसाला भुलून अनेक तरुण या योजनेतील फसवणुकीचे बळी होत असत. एजंटने सांगितलेल्या बक्षिसाला भुलून एखादा तरुण सहमती देत असे. त्यावेळी हे एजंट त्याच्याकडून कंपनीत नाव नोंदणीच्या नावाखाली 799 इतकी रक्कम घेत असत. तर, सिक्युरिटी मनीच्या नावाखाली नोंदणी करणाऱ्यांकडून 5,000 ते 20,000 इतकी रक्कम जमा करायचे.

कंपनीचे एजंट फोनवर या गोष्टी सांगत तेव्हा लोक सहज फसत. एवढेच नाही तर गर्भधारणा झाली नाही तरी आम्ही ५ लाखांचे बक्षीस देऊ, असे आश्वासन देण्यात यायचे त्यामुळे लोक 799 रुपये भरून या योजनेचे बळी व्हायचे. मात्र, यातील एका पिडीताने पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी त्याची गंभीर दाखल घेत तपास सुरु केला. पोलिसांनी कंपनीचे एजंट आणि या टोळीचा मुख्य सूत्रधार याच्यासह एकूण 8 जणांना अटक केली. त्यांच्यावर सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.