Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दाट धुक्यात मृत्यूचे तांडव, बसची डंपरला धडक; भीषण अपघातात 12 ठार

दाट धुक्यात मृत्यूचे तांडव, बसची डंपरला धडक; भीषण अपघातात 12 ठार


लखनऊ : दाट धुक्यामुळे झालेल्या भीषण अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. बसची डंपरला धडक होऊन हा अपघात झाला. या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहेत. उत्तर प्रदेशातील शाहजहानपूर जिल्ह्यात हा अपघात झाला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, हरदोई डेपोची बस प्रवाशांना घेऊन जात असताना दाट धुक्यात डंपरला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की अपघातात बसचा चुराडा झाला आहे. सेहरा मऊच्या दक्षिण भागात ही दुर्घटना घडली. अपघाताची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असून मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.