Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

फोनसाठी हानिकारक आहेत हे 12 अ‍ॅप्स! जाणून घ्या कोणते आहेत ते

फोनसाठी हानिकारक आहेत हे 12 अ‍ॅप्स! जाणून घ्या कोणते आहेत ते


नवी दिल्ली: अ‍ॅप्स कोणत्याही फोनसाठी आवश्यक असतात कारण ते वेगवेगळ्या कामांसाठी आपली गरज बनलेय. परंतु काहीवेळा असे देखील दिसून येते की काही अ‍ॅप्स आपल्यासाठी धोकादायक असतात. काही अ‍ॅप्स आपल्या फोनच्या डेटासाठीही नुकसानकारक असतात

दरम्यान, पुन्हा एक धक्कादायक बाब समोर आली आहे. प्ले स्टोअरवर असे 12 अ‍ॅप असल्याचे समोर आलेय. जे आपल्या फोनमधील फोटो आणि इतर डेटा चोरत आहेत. McAfee ने अशा काही अ‍ॅप्सची यादी जारी केली आहे ज्यांना 'Xamalicious' म्हणतात.

कंपनीच्या म्हणण्यानुसार, मालवेअर-संक्रमित अ‍ॅप्स फोनमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी 'सोशल इंजिनिअरिंग' वापरतात. ज्यामुळे डिव्हाइसच्या यूझरला माहिती न मिळताच कमांड-अँड-कंट्रोल सर्व्हरसह कम्यूनिकेट करण्याची परवानगी मिळते.

दरम्यान, फसवणूक करणारा फोनवर दुसरा पेलोड डाउनलोड करतो आणि फोनचा संपूर्ण कंट्रोल घेतो. त्यानंतर तो यूझरच्या परवानगीशिवायच जाहिरातींवर क्लिक करतो. यासोबतच अ‍ॅप इंस्टॉल करतो. चला जाणून घेऊया यामध्ये लिस्टमध्ये कोणकोणत्या अ‍ॅप्सचा समावेश आहे.

Essential Horoscope for Android
3D Skin Editor for PE Minecraft
Logo Maker Pro
Count Easy Calorie Calculator
Sound Volume Extender
LetterLink

Numerology: Personal horoscope & number predictions
Step Keeper: Easy Pedometer
Track Your Sleep
Numerology: Personal horoscope & number predictions
Astrological Navigator: Daily Horoscope & Tarot
Universal Calculator.

रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय की, हे अ‍ॅप सुमारे 3,27,000 डिव्हाइसला टार्गेट करत आहे. या अ‍ॅप्समध्ये, असे तीन अ‍ॅप्स आहेत जे 1,00,000 लोकांनी डाउनलोड केलेय. हे अ‍ॅप्स फोनवरून तात्काळ डिलीट करावेत, असे कंपनीने कठोर शब्दात म्हटले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.