Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सागंली; बैलगाडा शर्यतीच्या मैदान परिसरात पेरूच्या झाडावर आढळला 10 फुटांचा अजगर

सागंली;  बैलगाडा शर्यतीच्या मैदान परिसरात पेरूच्या झाडावर आढळला 10 फुटांचा अजगर


वाळवा तालुक्यात हा सर्प आढळणारी पहिलीच घटना असून हा सर्प आठ ते दहा वर्षांचा असावा, असा अंदाज वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. वन विभागाने घटनास्थळी धाव घेत अजगराला ताब्यात घेतलं असून त्याची तपासणी करून त्याला अधिवासात सोडणार असल्याचं सांगितलं. वन विभागाने दिलेली माहिती अशी, वाळवा येथील पश्चिमेला आशियाई महामार्गावरती मनिकंडण नावाचं हॉटेल आहे. या हॉटेलच्या पाठीमागे बैलगाड्यांच्या शर्यती घेतल्या जातात. याच मैदानाच्या एका पेरुच्या झाडावरती अजगर जातीचा सर्प रात्रीच्या वेळेस एका व्यक्तीला दिसून आला.

हा सर्प मांजराच्या पाठीमागे लागत मांजर झाडावर चढल्यानंतर त्याच्या पाठीमागून झाडावर चढला असावा, असा अंदाज आहे. पेरूचे झाड का हालत असल्याचे पाहून यावेळी संबंधित व्यक्तीने याबाबत इस्लामपूर पोलिसांना माहिती दिली. इस्लामपूर पोलिसांनी तात्काळ वन विभागाचे बावची विभागाचे वनरक्षक भीवा कोळेकर यांना कळवले.

यावेळी वन विभागाचे वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू टीम प्राणिमित्र युनूस मणेर, वनरक्षक राडे, विशाल दुबल व वन विभागाचे अधिकारी दाखल झाले. त्यांनी त्या अजगरास रेस्क्यू करून त्याची वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन वंजारी यांच्याकडून तपासणी करून घेण्यात आली. त्याला अधिवासात सोडण्यात येणार आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व सर्पमित्रांनी दाखवलेल्या परिसरात असे दुर्मिळ साप आढळत आहेत. त्यामुळं वनविभाग अधिकारी आणि प्राणी-सर्पमित्रांना याबाबत माहिती द्यावी. आढळलेले अजगर हे शारीरिक दृष्टीने उत्तम असून त्याला निसर्गाच्या अधिवासात सोडणार असल्याचे वन विभागाचे वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी यांनी सकाळशी बोलताना सांगितले.

अजगर आढळल्याने घाबरू नका

परिसरात विविध जातीचे सर्प आढळतात, त्यामुळे लोकांनी घाबरून जाऊ नये. याबाबत वनविभाग किंवा सर्प मित्रांना फोन करावा व माहिती द्यावी. याबाबत मो. ९८२२३४९६०६ या क्रमांकावर संपर्क साधावा.

-युनूस मणेर, प्राणी मित्र

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.