Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ब्राझीलमध्ये दिसले एलियन्स? गिर्यारोहकांनी शेअर केले 10 फूट उंचीच्या रहस्यमय आकृतीचे फुटेज; व्हिडिओ पहा

ब्राझीलमध्ये दिसले एलियन्स? गिर्यारोहकांनी शेअर केले 10 फूट उंचीच्या रहस्यमय आकृतीचे फुटेज; व्हिडिओ पहा

जगभरात एलियनबाबतचे गूढ अजूनही कायम आहे. याआधी अनेक लोकांनी एलियन पहिल्याचा दावा केला होता, मात्र याबाबतचे ठोस पुरावे समोर आले नाहीत. आता पुन्हा एकदा काही लोकांनी एलियन पाहिल्याचा दावा केला आहे. त्याचा व्हिडिओही त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या लोकांचा असा दावा आहे की, त्यांनी दोन विचित्र प्राणी पाहिले, ज्यांना ते एलियन मानत आहेत. 


एलियन्स पाहिल्याचा दावा करणारे हे लोक हायकर्स आहेत. हे लोक ब्राझीलमध्ये राहतात. त्यांना टेकडीच्या माथ्यावर उभे असलेले रहस्यमय प्राणी दिसल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या मते या मनुष्यासारखे दिसणाऱ्या प्राण्याची उंची साधारण 10 फुट असावी. ब्राझीलमध्ये याआधीही लोकांनी एलियन पाहिल्याचा दावा केला आहे. 1996 सालची एक घटनाही खूप चर्चेत आहे. वर्गिन्हा येथे यूएफओ पाहिल्याचा दावा करण्यात आला होता.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.