Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली येथे आरोग्य विभाग अंतर्गत नोकरीची उत्तम संधी; 107 पदे रिक्त

सांगली येथे आरोग्य विभाग अंतर्गत नोकरीची उत्तम संधी; 107 पदे रिक्त 

सागंली राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान सांगली अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी मोठी भरती  केली जाणार आहे. याबाबतची अधिकृत जाहिरात प्रसिध्द करण्यात आली असून एकूण 107 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. या भरती अंतर्गत पुर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, भुलतज्ञ, फिजिशियन, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, ईएनटी विशेषज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, स्टाफ नर्स, पुरुष बहुउद्देशिय कर्मचारी पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

वरील एकूण 107 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2024 आहे.


वयोमर्यादा -७० वर्षे
खुला - ३८ वर्षे, राखीव - ४३ वर्षे
आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator
अर्ज पाठविण्याचा पत्ता - वैदयकीय आरोग्य अधिकारी, आरसीएच कार्यालय, पाण्याच्या टाकीखाली, आपटा पोलिस चौकी शेजारी, उत्तर शिवाजी नगर, सांगली - ४१६४१६
PDF जाहिरात – NHM Sangli Miraj Jobs 2024
अधिकृत वेबसाईट – https://sangli.nic.in/

महत्वाचे

प्रथम विहित नमुन्यात अर्ज.
१० वी गुणपत्रक आणि सनद (जन्म तारीख पुरावा म्हणून).
१२वी गुणपत्रक आणि सनद.
पदवीचे गुणपत्रक (१ ले वर्ष ते अंतिम वर्ष-सर्व Attempt सह- जेणेकरुन एकत्रित गुण काढणे शक्य होईल) व पदवी प्रमाणपत्र (Convocation Certificate)
ज्या-त्या शैक्षणिक अर्हतेस/तांत्रीक पदांकरीता संबंधित परिषदेकडील नोंदणी लागू आहे त्या त्या शैक्षणिक अर्हतेची वैद्य असलेली परिषदेकडील तत्सम कौंन्सीलचे नोंदणी प्रमाणपत्र बंधनकारक राहील अन्यथा अपात्र ठरविण्यात येईल.

पासपोट आकाराचे दोन फोटो.
लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र.
राखीव संवर्गातील उमेदवारांनी जात प्रमाणपत्र.
अनुभव असलेस प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्रे.
शासकीय अनुभव असलेस अनुभव दाखला.
वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र.
वयाचा पुरावा म्हणून (शाळा सोडल्याचा दाखला, जन्माचा दाखला).
नावात बदल असल्यास राजपत्र, विवाह नोंदणी आणि नोटराईज्ज अॅफिडेव्हिट जोडणे बंधनकारक राहील.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.