एक वेळ, एक ठिकाण, 10 सेकंदात 4 जीव गेले; Video पहा
चेन्नई : अपघाताचा भयानक असा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. अवघ्या 10 सेकंदाचा हा अपघात आहे. ज्यात धडाधड गाड्या उडाल्या आहेत. काही क्षणात कित्येक जीव गेले आहेत. तामिळनाडूतील अपघाताचं भयंकर दृश्य जे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे. हा अपघात पाहिल्यावर तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.
तामिळनाडूच्या थोप्पूरमध्ये भयंकर अपघात झाला आहे. एका ट्रकने एका डम्परला धडक दिली. त्यानंतर त्या डम्परने दुसऱ्या डम्परला आणि कारला उडवलं आहे. चार गाड्यांचा हा विचित्र असा अपघात आहे. जो फक्त 10 सेकंदात घडला आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता फ्लायओव्हरवर दोन मार्ग आहेत. एका मार्गाने बऱ्याच गाड्या येताना दिसत आहेत. यात बाईक, कार, ट्रक, डम्परचा समावेश आहे. कारची धडक तरी जीव वाचला, पण रस्त्यावर उतरला तिथंच 'खेळ' झाला.
अचानक मागून येणारा एक ट्रक पुढच्या डम्परला धडकतो. त्यामुळे डम्परचा मार्ग बदलतो तो थेट दुसऱ्या बाजूच्या डम्परला धडकतो. तो डम्पर पुढे निघून जातो आणि ट्रकची धडक बसलेला डम्पर पुन्हा मार्ग बदलून आणि फ्लायओव्हरच्या मध्ये असलेल्या जागेतून खाली कोसळताना दिसतो. त्यावेळी तो त्याच्या मार्गात एक कार येते, ही कारही त्या डम्परच्या खाली चिरडून डम्परसह फ्लायओव्हरवरून कोसळते. ज्या एका ट्रकमुळे हा असा अपघात झाला, तो ट्रक तिथं थांबतो पण पेट घेतो. या भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला आहे तर 8 जण जखमी झाले आहे, असं वृत्त आज तकनं दिलं आहे.
समृद्धी महामार्गावरही अपघात
समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्सची कंटेनरला धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पळून गेला आहे. अमरावती जिल्ह्यातल्या वाढोना शिवणी दरम्यान चॅनल 128 वर हा अपघात झाला. याबाबत मिळालेली माहिती अशी की, खासगी ट्रॅव्हल्स बस अहमदनगरवरून रायपूरच्या दिशेने जात होती. त्यावेळी वाढोना शिवणी दरम्यान अपघात झाला. पहाटे पाचच्या सुमारास ही दुर्घटना घडली. चालकाला झोप लागल्याने हा अपघात झाल्याचं म्हटलं जात आहे. या अपघाताचा अधिक तपास सद्या तळेगाव दशासर पोलीस करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.