Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

४ बॅग्ज, ८२ स्मार्टफोनसह दोघे ताब्यात; राजधानी एक्सप्रेसमध्ये RPF ची मोठी कारवाई

४ बॅग्ज, ८२ स्मार्टफोनसह दोघे ताब्यात; राजधानी एक्सप्रेसमध्ये RPF ची मोठी कारवाई

रेल्वे प्रवासात अनेकदा प्रवाशांचे सामान चोरीला गेल्याच्या घटना घडतात. तर, चोरटे रेल्वेतून चोरीच्या सामनाची वाहतूकही करत असतात. त्यामुळेच, रेल्वे पोलीस सदैव रेल्वे प्रवासत सतर्क असते. रेल्वे पोलिसांमुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि भयमुक्त होतो. मात्र, तरीही रेल्वेतून चोरीच्या घटना उघडकीस येतातच. रेल्वे प्रवासातील वाढत्या गर्दीचा फायदा घेत चोरटे हात साफ करत असतात. 


दरम्यान, मध्य रेल्वेच्या प्रवाशात रेल्वे पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन चोरट्यांना सामानासह रंगेहात अटक केली आहे. मध्य रेल्वेने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, राजधानी एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या दोघांना रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. तसेच, त्यांच्याकडून तब्बल ८२ नवेकोरे स्मार्टफोन जप्त करण्यात आले असून त्याची बाजार भावानुसारची किंमत ८ लाख रुपये एवढी आहे.


रेल्वेने शेअर केलेल्या व्हिडिओत दोन अल्पवयीन तरुण रेल्वेच्या सीटखाली ठेवलेल्या बॅग्जमधून तब्बल ८२ स्मार्टफोन घेऊन जात होते. मात्र, रेल्वे पोलिसांनी संशय येताच त्यांची तपासणी केली असता, मोबाईल फोन्सने भरलेल्या बॅग्ज आढळून आल्या आहेत. गाडी क्रमांक १२४३३ चेन्नई-निझामुद्दीन दिल्ली राजधानी एक्सप्रेसमध्ये ही घटना उघडकीस आली आहे. एक्सप्रेसच्या बी-९ कोचमधून हे दोघे तरुण ८ डिसेंबर रोजी प्रवास करत होते. नागपूर स्थानकावर रेल्वे पोलिसांनी तपासणी केली असता, त्यांना कटोल स्थानकाजवळ तब्बल ४ बॅग्ज आढळून आल्या. अमला स्टेशनवरुन ह्या तरुणांनी हे मोबाईल चोरले होते, अशी माहिती प्राथमिक चौकशीतून समोर आली आहे. दरम्यान, रेल्वे पोलिसांनी दोघांनाही सामानासह ताब्यात घेतले असून पुढील कारवाईसाठी अमला पोलिसांच्या ताब्यात देणार आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.