Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

होत्याचं नव्हतं! MBBSची डिग्री घेऊन 'तो' आनंदानं निघाला अन् रस्त्यात सापानं...

होत्याचं नव्हतं! MBBSची डिग्री घेऊन 'तो' आनंदानं निघाला अन् रस्त्यात सापानं...


जीवनातील सर्वोच्च आनंद आणि दुःख एकाच दिवशी मिळावं यासारखं दुर्देव दुसरं नाही. पण अशीच एक घटना कर्नाटकात घडली आहे. डॉक्टरकीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर दीक्षांत समारंभातून डिग्री घेऊन घरी निघालेल्या विद्यार्थ्यावर एक विचित्र परिस्थिती ओढवली, यामध्ये त्याचा मृत्यू झाला. यामुळं या घटनेची सर्वत्र चर्चा होती.


अदित बालाकृष्णन असं या मृत्यू पावलेल्या एमबीबीएसच्या विद्यार्थ्याचं नाव आहे. बंगळुरुपासून ८० किमी दूर तुमकुरु इथल्या बाहरी भागातील श्री सिद्धार्थ मेडिकल कॉलेजमध्ये तो शिकत होता. तो मूळचा केरळच्या त्रिशूर इथला असून आपल्या कॉलेजमधील दीक्षांत समारंभाला हजेरी लावल्यानंतर घरी परतताना त्याच्यावर काळानं घाला घातला. 

नेमकं काय घडलं?

पोलिसांच्या माहितीनुसार, सिद्धार्थ मेडिकल कॉलेजचा दीक्षांत समारंभ पार पडला. काँग्रेसचे खासदार शशी थरुर आणि कर्नाटकचे गृहमंत्री परमेश्वर हे या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे होते. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर अदित आपली डिग्री घेऊन रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घरी निघाला होता.

यावेळी त्याच्यासोबत त्याची आई आणि नातेवाईक देखील होते. पण रस्त्यात त्याच्यावर एका विषारी सापानं हल्ला केला. त्याच्या रुमजवळच्या पार्किंगमध्येच ही घटना घडली. पण त्याला सापानं दंश केल्याचं कोणाच्याही लक्षात आलं नाही.

घरी पोहोचल्यानंतर अदित अचानक कोसळला त्यानंतर त्याला कुटुंबियांनी रुग्णालयात दाखल केलं. पण उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. पोस्टमॉर्टम दरम्यान अदिलच्या शरिरावर विषारी सापानं दंश केल्याचं खूण दिसून आली. पण कोणाला हे काही कळायच्या आतच त्याच्या शरिरात विष मोठ्या प्रमाणावर पसरलं होतं. त्यामुळं त्याचा मृत्यू झाला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.