Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

रंग काढताना कलरच्या डब्यावर बसला आणि गेला जीव; Live Video

रंग काढताना कलरच्या डब्यावर बसला आणि गेला जीव; Live Video

रंग काढताना कलरच्या डब्यावर बसला आणि गेला जीव;
भोपाळ, 29 डिसेंबर : उठता-बसता, चालता- बोलता, नाचता-गाता अचानक मृत्यू झाल्याची बरीच प्रकरणं घडली आहेत. मृत्यूचे असे बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. असाच एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे.ज्यात रंगकाम करताना एका पेंटरला मृत्यूनं गाठलं आहे. रंग काढताना तो कलरच्या डब्यावर बसला आणि त्याचा मृत्यू झाला आहे. त्याच्या मृत्यूचं दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे.   मध्य प्रदेशच्या इंदूरमधील ही घटना आहे. मृत्यू झालेल्या पेंटरचं नाव आशिष असं असल्याचं सांगितलं जातं आहे. त्याला अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे तो पाणी प्यायला, तोंड धुतलं आणि तो कलरच्या डब्यावर बसला. बराच वेळ तो बसून होता. अचानक त्याच्या छातीत कळ आली आणि जवळपास एका मिनिटाने तो धाडकन कोसळला. त्याचे सहकारी धावत त्याच्याजवळ आले. त्याला वाचवण्याचा प्रयत्न करू लागले. माहितीनुसार त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला.



@KashifKakvi एक्स अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या घटनेबाबत पोस्टमध्ये माहिती देण्यात आल आहे. या व्यक्तीच्या हृदयाचे ठोके थांबल्याचं पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे. तसंच एखादी व्यक्ती घरातून बाहेर पडल्यावर संध्याकाळी जिवंत घरी परत येईल, असा दावा कोणीही करू शकत नाही, असंही म्हटलं आहे.या व्यक्तीला हार्ट अटॅक आला होता. हार्ट अटॅक येण्याआधी काही लक्षणं दिसतात.

छातीत अस्वस्थता किंवा वेदना - तुमच्या छातीत अस्वस्थ दाब, वेदना, सुन्नपणा जाणवत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. जर ही अस्वस्थता तुमच्या हात, मान, जबडा किंवा पाठीवर पसरत असेल तर तुम्ही सावध राहून लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये पोहोचावे. हृदयविकाराचा झटका येण्याच्या काही मिनिटे किंवा तासांपूर्वीची ही लक्षणे आहेत.थकवा जाणवणं कष्ट किंवा परिश्रम न करता थकवा आल्यास हार्ट अटॅकची घंटा असू शकते. खरे तर कोलेस्टेरॉलमुळे हृदयाच्या धमन्या बंद होतात किंवा अरुंद होतात, तेव्हा हृदयाला अधिक काम करावे लागते. त्यामुळे लवकरच थकवा जाणवू लागतो. अशा परिस्थितीत, रात्री चांगली झोप घेतल्यानंतरही तुम्हाला सुस्ती आणि थकवा जाणवत असेल, तर ते धोक्याचे ठरू शकते.चक्कर येणं किंवा मळमळ - जर तुम्हाला दिवसातून

अनेक वेळा चक्कर येत असेल, उलट्या झाल्यासारखे वाटत असेल आणि तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल तर हे देखील हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण असू शकते. खरं तर, जेव्हा तुमचे हृदय कमकुवत होते, तेव्हा त्याद्वारे रक्त परिसंचरण देखील मर्यादित होते. अशा परिस्थितीत मेंदूपर्यंत ऑक्सिजन आवश्यकतेनुसार पोहोचत नाही. त्यामुळे चक्कर येणे किंवा डोके जड होणे अशा समस्या उद्भवू लागतात.

धाप लागणं - जर तुम्हाला श्वासोच्छवासात काही फरक जाणवत असेल किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर हे देखील हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण असू शकते. जेव्हा हृदय आपले कार्य योग्यरित्या करू शकत नाही, तेव्हा योग्य प्रमाणात ऑक्सिजन फुफ्फुसांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. तुमच्यासोबतही असेच काही होत असेल, तर उशीर न करता ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा आणि आवश्यक चाचण्या करून घ्या.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.