Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

BreakingNews ! कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे जाऊ शकतो तुमच्या घशातील आवाज; नव्या संशोधनात धक्कादायक खुलासा

BreakingNews ! कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे जाऊ शकतो तुमच्या घशातील आवाज; नव्या संशोधनात धक्कादायक खुलासा


कोरोनाचा JN 1 या नव्या विषाणूने जगभरात चिंता वाढवली आहे. केवळ चीन-सिंगापूरच नाही तर आता भारतातूनही या विषाणूने बाधित अनेक नागरीक आढळत आहेत. हा संसर्ग वेगाने पसरत आहे. आतापर्यंत केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोव्याच्या काही भागांमध्ये या विषाणूने बाधित नागरीक आढळले आहेत. Omicron च्या JN.1 या नवीन सब-व्हेरियंटमुळे कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. त्यामुळे संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे. कोरोनासंदर्भातील ताज्या संशोधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. संशोधात असे आढळून आले आहे की या धोकादायक विषाणूमुळे केवळ चव आणि गंधच नाही तर घशाचेही गंभीर नुकसान होऊ शकते. एका १५ वर्षांच्या मुलीचा आवाज कोरोना विषाणूमुळे गेल्याचे संशोधनात आढळले आहे.

काही बालरोगशास्त्र तज्ञांनी SARS-CoV-2 infection यावर संशोधन केले असून यात नव्या विषाणूने बाधित कोरोना रुग्णांमध्ये घशातही संसर्ग होत असल्याचे आढळले. याचा रुग्णाच्या थेट आवाजावर परिमाण होत असल्याचे आढळेल आहे. वैद्यकीय भाषेत याला व्होकल कॉर्ड पॅरालिसिस संबोधले गेले आहे.

जीएनसीटीडी मंत्री (आरोग्य) सौरभ भारद्वाज यांनी नोव्हेंबर-२०२३ या कालावधीत चीनमधील मुलांमध्ये न्यूमोनियासह श्वसनाच्या आजारांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर ३० नोव्हेंबर रोजी श्वसन औषध तज्ञांसोबत बैठक बोलावली होती. ज्यामध्ये RT PCR द्वारे न्यूमोनियाच्या गंभीर प्रकरणांची चाचणी करणे, नमुन्यांचा तपशील ठेवणे तसेच अँटी-व्हायरल औषधांचा पुरेसा साठा राखणे यावर काही नियमावली जारी केली होती. यामध्ये १३ डिसेंबर ते १७ डिसेंबर या कालावधीत सर्व रूग्णालयांमध्ये विविध बाबींवर तयारीचे मूल्यांकन करण्यासाठी मॉक ड्रिल देखील घेण्यात आले.

कोरोनाचा धोका पाहता २० डिसेंबर रोजी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनीही सर्व आरोग्य मंत्र्यांची बैठक बोलावत दर तीन महिन्यांनी कोविड चाचण्या आणि हॉस्पिटल्सच्या मॉक ड्रिल घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या. तसेच आतापासून आरोग्य यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.