Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

BreakingNews ! रस्ते अपघातात जखमींवर कॅशलेस उपचार, योजना आहे तरी काय

BreakingNews ! रस्ते अपघातात जखमींवर कॅशलेस उपचार, योजना आहे तरी काय


नवी दिल्ली : रस्ते अपघातात वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेकांचा बळी जातो. या मृत्यूला आळा घालण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने उपाय करत आहे. देशभरात गेल्या काही वर्षांत दर्जेदार रस्ते झाले आहे. रस्त्यांचे जाळे तयार झाले आहे. समृद्धी, ग्रीन एक्सप्रेसवे आणि इतर अनेक मोठी रस्त्यांचे जाळे विणल्या गेले आहे. त्याच प्रमाणात अपघात पण वाढले आहे. रस्ते अपघातातील जखमींवर लागलीच उपचारासाठी केंद्र सरकार लवकरच नवीन योजना घेऊन येत आहे. कॅशलेस उपचारासाठी खास योजना आणण्याची कवायत करण्यात येत आहे. त्यामुळे अनेकांचे बळी थांबू शकतील.

आता देशभर मॉडेल

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने  या अपघातातील जखमींवर कॅशलेस उपचार करण्याची योजना आखली आहे. पुढील तीन ते चार महिन्यात देशभरातील रस्ते अपघातातील जखमींवर त्यातंर्गत कॅशलेस उपचार करण्यात येतील. त्यासाठी ही योजना सुरु करण्यात येत आहे. नवीन मोटार वाहन अधिनियम, 2019 अंतर्गत ही योजना कार्यन्वीत होईल. काही राज्यांत यापूर्वीच ही योजना सुरु आहे. आता अपडेटनंतर देशभर ही योजना लागू होईल.

गोल्डन आवर वाचवले प्राण

दिल्लीत नुकताच ग्लोबल रोड सेफ्टी इनिशिएटिव्ह हा कार्यक्रम घेण्यात आला. इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रॅफिक एज्युकेशनने MoRTH च्या सहायाने हा कार्यक्रम घेतला होता. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे सचिव अनुराग जैन यांनी यांनी नवीन कायद्यात सूचीत केल्याप्रमाणे गोल्डन आवरमध्ये उपचार मिळण्याची सुविधा देण्यावर भर दिला.

5 E वर जोर

भारतात रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांचा आकडा मोठा आहे. केंद्र सरकारने हा आकडा कमी करण्यावर भर दिला आहे. 2030 पर्यंत अपघातांची संख्या 50 टक्के कमी करण्यासाठी उपाय करण्यात येत आहे. त्यासाठी एज्युकेशन, इंजिनिअरिंग, इफोर्समेंट आणि इमरजेन्सी केअर या 5 E वर जोर देण्यात येत आहे. रस्ते अपघातात जखमींचे प्राण वाचवणे आणि त्यांना तात्काळ उपचाराची सुविधा देण्यासाठी योजना आखण्यात येत आहे. येत्या काही दिवसांत हे बदल दिसू शकतात.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.